Advertisement

पुरोगामी पत्रकार संघटना मोताळा तालुका अध्यक्षपदी विजय दोडे तर उपाध्यक्ष किशोर वाकोडे. मोताळा तालुका कार्यकारिणी जाहीर

पुरोगामी पत्रकार संघटना मोताळा तालुका अध्यक्षपदी विजय दोडे तर उपाध्यक्ष किशोर वाकोडे. मोताळा तालुका कार्यकारिणी जाहीर
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मोताळा: दि.६/२/२०२४ रोजी मोताळा येथील बोधेकर कॉम्प्लेक्स (मोताळा फाटा) येथे मंगळवार रोजी झालेल्या बैठकीत पुरोगामी पत्रकार संघटनेची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष विष्णू कंकाळ, विदर्भ अध्यक्ष किरण मोरे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कान्हेरकर या मान्यवरांच्या हस्ते नवीन कार्यकारणी जाहीर करून नियुक्ती पत्र देण्यात आले.
मोताळा तालुका अध्यक्षपदी विजय दोडे, उपाध्यक्षपदी किशोर वाकोडे, सचिवपदी इमरान शहा हुसेन शहा, महासचिवपदी विशाल मोरे, कार्याध्यक्षपदी शेख अफसर शेख अकबर, संघटकपदी रोशन गायकवाड, सल्लागारपदी शेषराव दाभाडे यांची नेमणूक करून सन्मानित करण्यात आले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना संघटनेचे उद्दिष्ट, संघटनेचे धोरण, संघटनेची बांधनी किती महत्त्वाची आहे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण कान्हेरकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.

त्यावेळी खामगाव शहर अध्यक्ष पद्माकर धुरंदर, नांदुरा शहर उपाध्यक्ष शिवशंकर कुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन गायकवाड यांनी केले.

Post a Comment

0 Comments