Advertisement

समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर संपन्न

समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर संपन्न
जळगाव जामोद तालुका प्रतिनिधी:-
भारतीय बौद्ध महासभा जळगाव जामोद च्या वतीने पंचशील नगर जळगाव जामोद येथे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर भारतीय बौद्ध महासभा ता-अध्यक्ष आयु.जगदीश हातेकर यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रीत्या पार पडले "बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांनी 1927 साली समता सैनिक दलाची स्थापना केली ही संस्था समता प्रस्थापित व्हावी या करीता निर्माण करण्यात आली प्रत्येक घरात एक समता सैनिक दलाचा एक सैनिक असावा या उद्देशाने जळगाव जामोद येथे "समता सैनिक दल प्रशिक्षण शिबीर" घेण्यात आले या शिबीरात 31 महीला शिबीरार्थ्यांनी सहभाग घेतला या शिबीराला शिबीर प्रमुख म्हणून आद.आर.ओ.सावंग सर लेफ्टनंट कर्नल लाभले होते आणि शिबीर प्रशिक्षक म्हणून आद.डि.एस.वले सर व विलास धुरंधर कंपनी कमांडर हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.प्रा.सुभाष सिरसाट ता-सरचिटणिस यांनी केले कार्यक्रमाला आयु.भास्कर जुंबळे ता-उपाध्यक्ष संरक्षण विभाग, व परमेश्वर पारवे,सुरेश सिरसाट, आनंद वानखडे, ओंकार वानखडे समता सैनिक दल मुंबई हे उपस्थित होते पंचशील नगर जळगाव जामोद येथील महीला सैनिक हे प्रॅक्टिस करीता हजर होते त्यांनी शिबीर यशस्वीते करीता अथक प्रयत्न केले सरनत्तय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments