वार्ड क्र 6मधील नागरिकांचे ग्रामपंचायत ला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
दिनांक 19 सप्टेंबर रोजी सुनगाव येथील वार्ड क्रमांक सहा मधील नागरिकांनी ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे सविस्तर असे की दिनांक 27 मार्च 2023 रोजी तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत पालखी रस्ता कामाची निवड केली होती त्यामध्ये प्राधान्य प्रमाणे बराणपुर रोड ते संजय सिंग राजपूत यांच्या घरापर्यंत डॉ काळपांडे ते प्रभाकर कंटाळे अनिल कोथळकर ते प्रल्हाद एडाखे नागेश्वर महाराज मंदिर ते अवजीसिद्ध महाराज मंदिर ग्रामपंचायत कार्यालय ते बस स्टँड अनंता अंबडकार ते राजेश झंवर दुकान पुरुषोत्तम कठाळे ते देवकाबाई पले या अनुक्रमाने रस्ता बांधकाम करण्यास प्रवास मंजुरी दिली आहे तरी त्या ठराव मधील रस्ता बांधकाम हे वार्ड क्रमांक चार मध्ये वळविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे वार्ड चार मध्ये रस्ता आठ ते दहा दिवसापासून खोदलेला आहे तरी आपण घेतलेले ठरावानुसार बराणपुर रोड ते संजय सिंग राजपूत घरापर्यंतचा रस्ता मागील उन्हाळ्यात झालेला तरी ठरावनुसार प्राधान्य क्रमाने निवड केलेल्या रस्ता बांधकाम करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे व ती केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचे वार्ड क्रमांक सुनगाव येथील नागरिक अमोल प्रल्हाद येडाखे व इतर नागरिकांनीमागणी केली आहे या निवेदनावर 40 ते 45 नागरिकांच्या सह्या आहेत
0 Comments