Advertisement

सुनगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न...

*सुनगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न...*
जळगाव जामोद प्रतिनिधी-

ग्राम सुनगाव येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा व उर्दू प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक १२ जानेवारी रोजी बाला आनंद मेळाव्याचे आयोजन शाळेचे आवारात मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात संपूर्ण झाले. विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच आपल्या खाद्यपदार्थांचे वेगवेगळे स्टॉल शाळेच्या परिसरात लावले होते. यामध्ये पापड, मटकी, चवळी उसळ, इडली, पोहे, कुरकुरे, पाणीपुरी, बर्फी, चणे उसळ, मिसळ, सोनपापडी यासारखे बरेच खाद्यपदार्थ विक्रीस आणले होते. बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटनासाठी शाळा समिती अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार राजकुमार भड,गजानन खिरोडकार, गणेश भड, गजानन सोनटक्के, अश्विन राजपुत, शिवदास सोनोने,अनिल भगत, तंटामुक्ती अध्यक्ष शालिग्राम भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता कुरवाडे, माजी शाळा समिती





 अध्यक्ष अंबडकार,शाळा समिती उपाध्यक्ष संगीता राजपुत यांची उपस्थिती होती. यावेळी शाळा समिती अध्यक्ष किशोर धुळे यांच्या हस्ते फीत कापून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व प्रमुख मान्यवर व गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या व आणलेल्या खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला, तसेच शाळेच्या शिक्षक शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आणलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.. विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या पाककृतीचे व विविध खाद्यपदार्थांचे कौतुक केले..यावेळी जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र राखोंडे सर, उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख मजहर सर, बेग सर, प्रदीप वाकेकर सर, अंबडकार सर, अस्मिता क्षिरसागर, साबे मॅडम, बोंबटकार मॅडम, गवई मॅडम, उमाळे मॅडम, कर्मचारी मनोहर वानखडे राजु अंदुरकार यांच्यासह बहुसंख्य शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Post a Comment

0 Comments