*गाडगेबाबा जयंती निमित्त बौद्ध वधु वर परिचय मेळावा संपन्न*
*दिडशे उपवर मुलामुलींनी दिला परिचय*
*ऋणानुबंध संस्थेचा अभिनव उपक्रम*
चिखली : - ऋणानुबंध संस्थेच्या वतीने नुकताच बौद्ध उपवधू-वर परिचय मेळावा पार पडला. पार पडलेल्या मेळाव्यात दिडशेच्यावर उपवर मुलामुलींनी परिचय दिला .
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली या संस्थेचे व्यवस्थापक प्रशांत डोंगरदिवे यांनी गेल्या तीन वर्षा पासून बौद्ध वधु-वर परीचय महामेळावे घेवून सामूहिक सोहळ्यात शेकडो लग्न पार पाडत आहेत. त्यामुळे दरवर्षी समाज बांधव सहभागी होतात यावर्षी राष्ट्र संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्त चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिदोरी सभागृहात वधू वर परिचय मेळावा घेण्यात आला त्यात दिडशेच्या वर उपवर वधू यांनी मेळाव्याला उपस्थित राहून आपला परिचय सादर केला. सदर परिचय मेळाव्यात अनेक वधूवरांनी आपली पसंती दर्शवून वधू-वर सोबत प्रत्यक्ष बोलनी केली.
बौद्ध समाजामध्ये लग्न जुळविणे ही कठीण समस्या होत बसलेली आहे. वधू वर पाहणे ही तर अतिशय किचकट समस्या निर्माण झालेली आहे. काही अंशी ही समस्या दूर करता येईल का? यासाठी ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली च्या वतीने डॉक्टर, वकील, इंजिनीअर, क्लास-१, क्लास-२, सरकारी, निमसरकारी, प्रोफेसर, शिक्षक, मॅनेजर, व्यावसायिक, उच्चशिक्षीत, पदवीधर, शेतकरी, मजुरदार, कंपनीत नोकरी, स्व-व्यवसाय, प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधुर, विधवा, अपंग व बौध्द समाजातील विवीध क्षेत्रातील राज्यभरातून वधू-वरांनी आपली हजेरी लावली. व प्रत्यक्ष परिचय करून घेतला. दरवर्षी असे मेळावे आयोजित करावे असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड. सतीश गवई यांनी केले. मार्गदर्शनक आनंदराव हिवाळे सर माजी प्राचार्य, डॉ प्रा सुभाष राऊत समाजसेवक, ऍड सुमित सरदार मा जि प सदस्य, भाई कैलास सुखदाने समाज सेवक यांचे समयोचित मार्गदर्शन झाले.
प्रमुख उपस्थिती अर्जुन दादा गवई, प्रा प्रकाश हिवाळे, हिम्मतरावं जाधव रिपाई तालुका अध्यक्ष, डॉ अशोक गवई, पत्रकार प्रताप मोरे, सदानंद मोरे, पोलिस आशिष जाधव यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत डोंगरदिवे, सूत्रसंचालन दयानंद निकाळजे तर आभार प्रदर्शन एस एस साळवे सर, यांनी केले तर यशस्वी तेसाठी संजय जाधव, विशाल गवई, प्रवीण डोंगरदिवे, शुदोधान गवई, शाहीर साहेबराव जाधव, जोगदंड साहेब माजी सैनिक विरसेन साळवे यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments