जळगाव जामोद शहरातील सुलतानपुरा, राजा भर्तृहरीनाथ मंदिर परिसर, वायली वेस पर्यंत चा रस्ता नव्याने बांधकाम करा समाजवादी पार्टीच्या वतीने दिनांक २५ जुलै रोजी देण्यात आले नगरपरिषद जळगाव जामोद मुख्याधिकारी यांना निवेदन... नगरपरिषद हद्दीतील सुलतानपुरा व राजा भर्तरीनाथ मंदिर परिसर व सईद पहलवान यांचे घरापासून ते वायली वेस पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते परंतु अचानक पणे रस्त्याचे काम थांबले रस्त्याचे काम कशामुळे थांबल्याचे कारण येथील नागरिकांना समजू शकले नसून येथील नागरिकांना या पावसाच्या दिवसांमध्ये चालणे सुद्धा मुश्किल झाले आहे. याचबरोबर स्मशानभूमी छोटा कब्रस्तान येथील तीन हायमास लाईट बसवने गरजेचे असून अद्यापही येथे कोणताही लाईट बसविला नाही त्याबाबत मुख्याधिकारी यांनी लेखी आश्वासन दिले आहे ते त्यांनी पाळावे.वरील मागण्यासाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सय्यद नफीस यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. या मागण्या दिनांक १३ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात याव्या अन्यथा दिनांक १४ ऑगस्ट पासून नगरपरिषद समोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष मुस्ताक जमदार, इम्रान दौला, शेख जहीर, अब्दुल तैमोर, शेख जलील उपस्थित होते..
0 Comments