सरसकट कर्जमाफी व इतर मागण्यासाठी भुमीपुत्रांचे आंदोलन....!
जळगाव (जा.) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दिनांक २८ जुलै रोजी एकत्रित येत युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करुन आपल्या भावना शासन दरबारी मांडल्या.
खरंतर या महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे दर दिवसाला ८-९ शेतकरी कर्जबाजारी पणाला कंटाळुन आत्महत्या करत असल्याचे दिसुन येत आहे असे भयानक वास्तव असुनही सरकार कर्जमाफी का.? करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. असे असतांना सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा.
दुसरीकडे २०२३-२४ चा उर्वरित पिकविमा मिळावा यासाठी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली मात्र अजुनही हजारो शेतकरी पिक विमा मिळण्यापासुन वंचित असुन त्या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पिक-विमा वितरीत करा.
मागील वर्षी २०२४ ला संपुर्ण जिल्हाभरात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची पिके खराब झाल्याने शासनाने मदत सुद्धा जाहीर केली मात्र अजुनही काही शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणामुळे अतिवृष्टीची मदत मिळाली नाही.तरी ही मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.
तसेच यावर्षी हुमनी अळीने हजारो हेक्टर जमीवरचे पिके उद्धवस्त केल्याने शेतकरी मात्र अजुनही संकटात सापडला आहे. ही बाब शासनाने लक्षात घेऊन पंचनाने करावे व शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी.
तसेच इतर विविध मागण्या घेऊन युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन तहसीलदार पवन पाटील साहेब जळगाव (जामोद) यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी तालुक्यातील शिवदास खिरोडकार,अनिल सिंह राजपूत,सदाशिव गवई,समाधान गवई,भाऊजी पाटील,वैभव जाणे,अजय गिरी,आकाश आटोळे,सोपान पाटील,सदाशिव जाणे,पप्पू पोटे,मोहन चांभारे,त्रिलोकसिंह राजपूत,फारुख शेख,संतोष गणगे,विठ्ठल खंडेराव,अनंता मारोडे,संदीप वाघ,रवींद्र निर्मळ, गौतम तायडे,आदर्श निंबाळकर,सतीश निंबाळकर,सागर गवळी, गजानन ढगे,रिजवान काझी,श्रीकृष्ण गवळी,ज्ञानेश्वर जाने,विजय निलजे,गजानन अढाव,रवी भालतडक,आदित्य भालतडक,भिकाजी वानखडे,विजय महाले,विजय निलजे,सुनील पाटील,विनोद गवई,विकास गवई,विष्णू गवळी,सागर लादे,दिलीप राऊत,रामकृष्ण लादे,राजेंद्र राखोंडे,ज्ञानेश्वर चोपडे, ज्वालासिंग राजपूत,ज्ञानेश्वर ठाकरे,ज्ञानेश्वर पिसे,अरविंद जाधव,अनिल म्हसाळ,दीपक आकोटकर,रघुनाथ भोंडे,बाळू घुळे,निलेश खिरोडकर,प्रज्वल वानखडे,सखाराम पाटील,अमर पाटील,संजय पाटील,राजूभाऊ नितवने तसेच या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
0 Comments