चिखली शहरातील महाबीज कार्यालय समोर श्रीक्षेत्र पंढरपूरहून खांमगावकडे परतत असलेली वारकर्यांच्या पंढरपूर - खामगाव ही बस अपघातग्रस्त झाल्याची अत्यंत दुःखद घटना झाली.या अपघातात सुमारे ३१ भाविक दुर्दैवाने जखमी झाले आहे.
या दुर्घटनेतील जखमी भाविकांच्या तातडीच्या उपचारासाठी स्थानिक आरोग्य विभागाच्या अधिकारी यांच्या व संबंधित प्रशासनाशी केंद्रीय मंत्री मा.ना.श्री.प्रतापरावजी जाधव साहेब संपर्कात असून, स्थानिक शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व आरोग्य विभागाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत तत्काळ पुरवली जात आहे.
भीषण अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना १०८ अॅम्ब्युलन्स व संत गजानन महाराज भक्त मंडळाच्या कार्डियाक अॅम्ब्युलन्स यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय, चिखली येथे तात्काळ दाखल करून उपचार सुरू करण्यात आले आहेत.
सर्व जखमी झालेल्या भाविकांच्या कुटुंबीयांनी चिंता करू नये, त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शासन घेत आहे. त्या सर्वांची लवकरात लवकर प्रकृती सुधारण्यासाठी मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो.
प्राथमिक माहितीनुसार, काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असून, डॉक्टरांची वैद्यकीय टीम उपचारासाठी सतत कार्यरत आहे.
0 Comments