इम्पॅक्ट अहिल्या न्यूज 24च्या बातमीचा..
सुनगाव येथे गुटखा पकडला जळगाव जा.पोलीसांची कारवाई..आरोपी फरार..एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगाव येथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करून विक्री होत आहे अशी बातमी अहिल्या न्युज 24 चँनल वर दिनांक
६ जुलै रोजी प्रकाशित करण्यात आली होती. बातमी प्रकाशित होताच जळगाव जामोद पोलिसांनी आपली सूत्र हलविली व अर्धा-एका तासातच संबंधित गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या राहत्या घरी पोलिसांनी रेड करून १ लाख २ हजार ५८३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे .या कारवाई दरम्यान आरोपी पसार झाला.. अहिल्या न्युज 24 च्या बातमीची दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी लगेच सुत्रे हलवुन गुप्त बातमीदारा कडुन सुनगावमध्ये एका घरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीकरिता साठवून ठेवला आहे अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ ,सहकारी पीएसआय प्रशांत शेंडगे,बीट जमादार शेख इरफान,पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील झुंजारकर यांनी घटनास्थळावर जाऊन रेड केली असता सुनगाव येथील आरोपी रामदास मानकर यांच्या घरामध्ये १ लाख २ हजार ५८३ रुपयांचा अवैध महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा सापडला. या कारवाई दरम्यान आरोपी रामदास बळीराम मानकर वय ३८ राहणार सुनगांव हा पळून गेला. त्याच्या राहत्या घरातुन वाह पान मसाला,डब्लू च्युविंग, केसरी युक्त विमल पान मसाला,वी-१ सुगंधीत तंबाखू , अन्नी गोल्ड सुपारी असा एकूण १ लाख २ हजार ५८३ रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जळगाव जामोद पोलिसांनी पकडला असुन सदरची फिर्याद अन्नसुरक्षा अधिकारी गुलाबसिंग वसावे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला दिल्याने रामदास बळीराम मानकर विरोधात अन्नसुरक्षा मानदे कायदा २००६ चे कलम २६(२),(I),२६(२)(iv), २७(३)(d),सहवाचन कलम २७(३)(e),सहवाचन कलम ३(१)(zz)(iv),५९ अन्वये गुन्हा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३,२७४,२७५,१२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनात पीएसआय प्रशांत झेंडगे करीत आहेत.
0 Comments