जळगाव जामोद तालुक्यामध्ये चाललंय काय? शहरात अनेक ठिकाणी अवैध गॅस भरणा अड्डे, पुरवठा विभाग तसेच पोलिसांचे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष...
इंधनाचे दर गगनाला भिडल्याने काही दलालांनी जळगाव जामोद तालुक्यामध्ये काही भागात अवैध गॅसविक्रीचे अड्डे सुरू केले आहेत.
या ठिकणाहून घरगुती सिलेंडरच्या टाक्यांमधील गॅस वाहनांमध्ये भरून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच घरगुती सिलेंडरचा सर्रास वापर धाबे हॉटेल चहाची दुकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असून या सर्वांना सिलेंडर पुरविणाऱ्या दलालांवर तसेच घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्या दुकानांवर हॉटेल तसेच चहाच्या हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी जळगाव जामोद शहरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश तेलंगळे यांनी दिनांक 30 जून रोजी स्थानिक तहसीलदार तथा पुरवठा अधिकारी जळगाव जामोद यांना तक्रार अर्ज देऊन केली आहे.विशेष म्हणजे शहर व तालुक्यात परिसरातील रहिवासी भागातच एका व्यावसायिकाने असा उद्योग सुरू केला आहे. अनधिकृतपणे रिफिलिंग करताना एखादी टाकी फुटून स्फोट झाला आणि त्यात जीवित वा वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे तर जळगाव जामोद तालुक्यातील काही गावांमध्ये सर्रासपणे व्यवसायिक अवैध गॅस विक्रीच्या अड्ड्यांवर मोटार व मशीनच्या सहाय्याने सिलेंडरमधील गॅस प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, स्कूल बस, तसेच अन्य चारचाकी वाहनांमध्ये भरून देत असल्याची बाब समोर आली आहे. रहिवाशांचा वावर असणाऱ्या परिसरात हा अवैध व्यवसाय केला जातो. सिलेंडरमधून गाडीमध्ये गॅस भरताना त्याचा विस्फोट झाला तर मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होऊ शकते. प्रत्येक व्यवसायाच्या ठिकाणी 20 ते 30 गॅस टाक्या दररोज खाली केल्या जातात. दिवसभरात शहर व तालुक्यातील घरगुती वापरातील सिलेंडरच्या 20 ते 30 टाक्या भरून दिल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे. एकीकडे सर्वसामान्यांना घरगुती वापराचा गॅस घेण्यासाठी नाव नोंदणी करावी लागते.नंतरच त्यांना सिलेंडर दिल्या जाते. मात्र, एजन्सीच्या दलालांना हाताशी धरून अवैध व्यवसाय करणारे भरदिवसा शेकडो सिलेंडर खाली करतात. त्यांच्याकडे ,पोलिस तसेच पुरवठा विभागाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सिलेंडरचा काळा बाजार करणारे अवैध अड्डे बंद करून या व्यवसायांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात.सिलेंडरचा काळा बाजार करणारे अवैध अड्डे बंद करून या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी जळगाव जामोद शहरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश तेलंगळे यांनी एका तक्रारीच्या माध्यमातून तहसीलदार तसेच पुरवठा विभाग जळगाव जामोद यांना केली आहे. शहरातील सिलेंडरचा अवैध व्यवसाय बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण करणार असल्याचा थेट इशाराच तहसीलदार तथा पुरवठा विभाग यांना निलेश तेलंग यांनी दिला आहे.
0 Comments