जळगाव जामोद प्रतिनिधी....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी दिनांक ७ जुलै रोजी कोतवाला तिसरे अपत्य असल्याने त्याची नियुक्ती रद्द करण्याची मागणी तहसीलदार जळगाव जामोद यांना केली आहे... सुनगाव ग्रामपंचायत हद्दीतील कहूपट्टा येथील रहिवासी तसेच मागील वर्षी कोतवाल म्हणून नोकरीवर रुजू झालेले सखाराम गिवरसिंग डावर यांना तीन अपत्य असून, त्यांना दोन मुली व २९ सप्टेंबर २०२१ रोजी मुलगा झाल्याने त्यास तीन अपत्य असून त्याला तीन अपत्य असल्याची माहिती लपवून ठेवली. व शासनाच्या नोकरीस नियुक्त झाला असून त्याची कोतवाल म्हणून नियुक्ती झालेली असून त्याला कोतवाल पदाचे मानधन मिळत आहे. सखाराम डावर याच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून आजपर्यंत घेतलेले सर्व मानधन व्याजासहित शासनाने परत घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जामोद शहराध्यक्ष नागेश भटकर यांनी तहसीलदार जळगाव जामोद यांना निवेदन देत केली आहे. तसेच तहसीलदार यांनी संबंधित शासनाची फसवणूक करणाऱ्या कोतवालावर गुन्हा दाखल न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराच निवेदन करते नागेश भटकर यांनी दिला आहे. याप्रकरणी शासनाची फसवणूक करणाऱ्या कोतवाला विरोधात तहसीलदार पवन पाटील काय निर्णय घेतात यावर सर्व जळगाव जामोद वासियांचे लक्ष लागले आहे.
0 Comments