Advertisement

जळगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदोस!शालेय विद्यार्थिनींसह , महाविद्यालयीन युवती व महिला त्रस्त.

जळगावात बुलेट रोड रोमिओंचा हैदोस!
शालेय विद्यार्थिनींसह , महाविद्यालयीन युवती व महिला त्रस्त.
प्रतिनिधी: जळगांव शहरात अनेक दिवसांपासून बुलेट दुचाकी धारक रोड रोमिओंचा हैदोससुरू असून शालेय विद्यार्थीनीसह, महाविद्यालयीन युवती, महिला यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यामध्ये महाविद्यालय वेळ संपल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थिनी रस्त्याने जाताना पाठीमागून बुलेट दुचाकी धारक जवळ येऊन कर्कश आवाज मुद्दामहून करतात तसेच मुद्दामहून हा.... हुं.... करीत हैदोस निर्माण करतात यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी सह शहरातील विद्यार्थिनी व महिलाना त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक पोलिस कर्मचारी व दामिनी पथक यांनी ऍक्शन मोडवर येऊन रोड रोमिओंना प्रतिबंध करून कारवाई करावी अशी मागणी शालेय विद्यार्थिनी, महाविद्यालयीन युवती व महिला यांच्याकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments