Advertisement

नगर परिषद चे नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अडते यांनी मुख्यधिकरी यांना घातला घेराव,

जळगाव जा/ बुलडाणा

नगर परिषद चे नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अडते यांनी मुख्यधिकरी यांना घातला घेराव,!!

अडते व्यापारी आणि मुख्याधिकारी यांचेसोबत चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद ,!!

 नगर परिषद प्रशासन चे मुख्य अधिकारी जळगाव जा यांनी भाजी बाजारातील अडते व्यापारी यांना दिलेल्या गळे वटे,फेरी वाले रेगडिवाले यांना दिनाक 3/7/2025 रोजी नवीन दर पत्रकार जारी करण्यान्याच्या नोटीस जाहीर केल्या त्यामध्ये नमूद केले की दिनाक 1/7/2025 पासून दैनिक बाजार वसुली मधील बंदिस्त दुकाने,गळे,ओटे यांना 100 रुपये ,रेगडीवळे,फेरीवाले,यांना यांना 50 रुपये या प्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या त्यमधे नोटीस बाबत आक्षेप घेण्यासाठी दिनाक 4/7/2025 रोजी नगर परिषद येथे येऊन आक्षेप नोंदवण्याबाबत नमूद केले त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडते व्यापारी यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीस बाबत केली आक्षेप  नोंदविण्यात आला व नवीन लागू केलेले दर आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले त्यावेळी अडते व व्यापारी यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरत भाजी बाजार मंडीतील समस्यांचा मोठा सामना करावा लागतो त्यामध्ये घण कचराची विल्लेवाट लावणे ,पिण्याची शुद्ध पाणी कायम स्वरुपी सुविधा पुरविणे,शौचालय प्रसाधन गृह उपलब्ध असून त्याची साफ सफाई केली नसल्याचे ते वापरण्या योग्य करणे, सफाई कर्मचारी यांचे कडून दररोज घण कचरा गोळा करून सफाई करणे ,पावसाळ्यात मद्ये  पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे व इतर सुविधा अडते व्यापारी करिता पुरविण्यात याव्या व बाजार मंडी तील समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा करून अडते व्यापारी यांनी केलेला आक्षेप बाबत अखेर चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला,
त्यावेळी व्यापारी अडते संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ,उपाध्यक्ष सहेबाज आफताब,यांचेसह मोहंमद हारून,हमीद जमदार,नितीन ढगे,हिदायत खान,मोहम्मद हरिश,आशिक,रमेश ढगे,साजिद आफताब,सईद तनवीर,सहुर अहमद,मोहम्मद फारुक,सईद कलम, रामदास लवरे,इम्रान दौला,सहेजड आफताब यांच्या सह मोठ्या संख्येने अडते व्यापारी यांची उपस्थिती होती 

अहिल्या न्यूज चॅनल करिता कार्यकारी संपादिका सौ सरला ताई राजेंद्र ससाणे 

जळगाव जा ,बुलडाणा

Post a Comment

0 Comments