Advertisement

सुनगाव येथे गुटख्याची खुलेआम विक्री! कारवाई करणार कोण?

सुनगाव येथे गुटख्याची खुलेआम विक्री! कारवाई करणार कोण? 

जळगाव जामोद:-
सुनगाव परिसरातील किराणा व पान टपऱ्या तसेच इतर चिल्लर दुकानांमध्येही गुटख्याची खुलेआम अवैध विक्री सुरू असून  याकडे स्थानिक पोलीस वअन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असून परिसरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध विक्रीतून उलाढाल होत असून मोटर सायकलच्या डिक्कीतून व मोठ्या पिशवीतून गावात काही ठिकाणी गुटखा आणल्या जात असल्याचे दिसून येत आहे मात्र पोलीस व अन्न व औषधप्रशासनाची कारवाई शून्य आहे या अवैध गुटखा विक्रीला आळा  घालण्यासाठी प्रशासनानेे पुढाकार घेत कडक पावले उचलण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून बोलताना व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र शासनाने काही वर्षापासून गुटखाबंदी केली असून ही गुटखाबंदी केवळ कागदावरच दिसत आहे ,प्रत्यक्षात गुटखाबंदी नसून चोरीच्या मार्गाने गुटखा सर्रास विकल्या जात आहे गुटखा तस्करी करणारे रॅकेट जळगाव जामोद पोलिसांच्या रडारवर असताना या ठिकाणी गुटखा येतो कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे मध्यप्रदेश मार्गे अवैध गुटखा येत असल्याची माहिती आहे रात्रीच्या वेळी या गुटख्याची  विल्हेवाट लावली जात असून काही दुकानदार खुलेआम  गुटखा विक्री करीत आहेत सुंदर परिसरात अनेक ठिकाणी गुटखा माफिया खुलेआम गुटखा पोहोचून गुटखा विकत आहेत मात्र गुटखा विक्री बंद असतांना दुकानदार गुटखा विकत असल्याने नव युवक लहान मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत बरेचशे शाळकरी विद्यार्थी गुटखा व्यसानच्या आहारी गेले आहेत त्यामुळे गुटखा विक्री करणाऱ्या दुकानांवर काय कारवाई केली जाते हे पाहणे गरजेचे झाले आहे .अवैध गुटखा विक्री हे पोलिसांसमोर व अन्न औषध प्रशासना पुढे एक तगडे आवाहन निर्माण झाले आहे आता तरी याकडे अन्न औषध प्रशासनाने व पोलीस विभागाने त्वरित लक्ष देऊन सर्रास होत असलेल्या या अवैध गुटखा विक्रीला आळा घालण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. बुलढाणा जिल्ह्याला नवीनच लाभलेले आयपीएस अधिकारी पोलीस अधीक्षक तांबे याकडे लक्ष देतील काय असा प्रश्न जनतेमध्ये निर्माण झाला आहे.

Post a Comment

0 Comments