|| विद्यार्थ्यांनी दिली वनवासी वस्तीगृहाला भेट ||
स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालयातील सत्र 7 च्या विद्यार्थ्यांनी ' वनवासी आदिवासी मुलांचे वसतिगृह येथे भेट दिली.
या भेटीचा उद्देश वसतिगृहातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे व त्यांच्या व्यवस्थेची पाहणी करणे हा होता.
सत्र 7 च्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उद्योजकता, शिक्षणाचे महत्त्व आणि आत्मनिर्भर होण्याचे मार्ग या विषयी मार्गदर्शन केले.
श्री नारायणसिह वयासा व आजबरावजी देखमुख यांनी 1983 मध्ये संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उदेश म्हणजे आदिवासी तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणा करिता काही मदत करणे व विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हा आहे.
या उपक्रमामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
या उपक्रमात वसतिगृह अधीक्षक यांनी सहकार्य केले व वसतिगृहाबदल सर्व माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन उज्वल उईके, वैभव मेहंगे, प्रशिक विरघट, रवि सावळे व प्रतिक मेश्राम यांनी केले. यावेळी प्राचार्य प्रा. योगेश गवई, प्रा. प्रितेश वानखेडे आणि प्रा. जिवेश साळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
0 Comments