Advertisement

एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयामध्ये ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न*

एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालयामध्ये ऑक्सफर्ड शैली राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा संपन्न
  
दिनांक १२/०७/२०२५ व १३/०७/२०२५ रोजी दर्द से हमदर्द तक ट्रस्ट, मुंबई  व  एस. एन.बी.पी. विधी महाविद्यालय, मोरवाडी, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वादविवाद   ( विषय-  कॉलेजियम प्रणाली : शाप की वरदान ?) स्पर्धा पार पडल्या. या स्पर्ध्येमध्ये बालाजी लॉ स्कूलने विजेतेपद पटकावले ,उप विजेतेपद मुंबईच्या के.ई.एस. व पी.जि सी.एल. या   महाविद्यालयांनी बाजी मारली. 

युविका धामने   ( बेस्ट स्पीकर) तर तेजस घोलेकर ( बेस्ट रि- बुटर) ठरले. विजेत्या संघाना रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मा. ए. आर. जोशी  व मुंबई विद्यापीठाच्या प्रोफेसर डॉ. रश्मी ओझा हे अंतिम फेरीचे  परीक्षक होते. या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेस दर्द से हमदर्द तक ट्रस्ट मुंबईचे संस्थापक ॲडव्होकेट  प्रकाश सालसिंगीकर, सी. ई. ओ. ॲडव्होकेट सुनिता सालसिंगीकर , सुभद्रा एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वृषाली भोसले , ॲडव्होकेट ऋतुजा भोसले, प्राचार्या डॉ. रोहिणी जगताप , उप प्राचार्य कैलाश पोळ ,  महाविद्यालयाचे  शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या  स्पर्धेमध्ये २६ महाविद्यालयानी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अर्पिता गोस्वामी यांनी केले.

Post a Comment

0 Comments