Advertisement

जटाशंकर येथे दर्शनाला जाणाऱ्या दिव्यागाला वन विभाग कडून मारहाण ?भाविक भक्ताकडून वन विभाग करतोय अवैध सक्तीची वसुली



जटाशंकर येथे दर्शनाला जाणाऱ्या दिव्यागाला वन विभाग कडून मारहाण,!!

भाविक भकत कडून विभाग करतोय अवैधव सक्तीची वसुली,!!

भाविका कडून घेणारी अवैध वसुली थांबवून मारहाण करणाऱ्या वर कारवाईची भाविकांची मागणी,!!

दिनांक 4/8/2025 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील श्रीक्षेत्र जटाशंकर येथे लाखो भाविक महादेवाच्या दर्शनात जात असता तेथे फॉरेस्ट विभाग ग्रामविकास कमिटी यांनी प्रत्येक भाविकांनजवडून वीस रुपयाची पावती सक्तीची फाडण्यासाठी आग्रही धरला व कोणी विरोध केला किंवा कोणी समोर निघून गेला तर त्याला फॉरेस्ट विभागीय कर्मचारी आणि कमिटीने मारहाण केली व सामान्य जनतेचे म्हणणे आहे की तुम्ही या ठिकाणी हे सक्तीची वसुली करू नये पवित्र श्रावण महिन्यामध्ये भाविक भक्त महादेवाच्या दर्शनाला जात असतात एकीकडे सरकार हिंदुत्व टिकलं पाहिजे हिंदू धर्म खतरे मे है असे करून लोकांना भडकवत आहे आणि तेच सरकार अशा सक्तीच्या वसुली करून जनतेकडून पैशाचाही लूटमार करत आहे याकडे शासनाने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे व एका अपंग व्यक्तीला आज त्या ठिकाणी त्यांनी पावती न फाडल्यामुळे मारहाण केली त्याच्या पायातून रक्त सुद्धा आले श्रावण महिन्यात भाविक भक्त तिथे दर्शनाला जात असतात व हे शासन प्रशासन भाविकांना सुख सुविधा न पुरविता उलट पावती न फडल्यास मारहाण करून जनतेवर अन्याय करत आहे,जनतेच ची एकच मागणी आहे की  हा प्रकार थांबवावा निदान श्रावण महिन्यातील चार सोमवारी तरी ही सक्तीची वसुली करू नये आणि दिव्यागाला मारहाण करणाऱ्या वन विभागा चे वन मजुरावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी जनतेची कडून मागणी होत आहे 

अहिल्या न्युज 24 करिता सौं सरला ताई राजेंद्र ससाणे 

जळगाव, जा, बुलडाणा

Post a Comment

0 Comments