Advertisement

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा ?भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व किसान काँग्रेस चे वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलनाचा इशारा,,!

भारतीय राष्ट्रीय कोंगेस व किसान काँग्रेस चे वतीने मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर,!!


भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेस यांच्यावतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार यांच्यामार्फत दिनांक 5/8/2025 रोजी निवेदन सादर,करण्यात आले निवेदनत सरकारने निवडणुकीआधी जाहीर केलेला आश्वासन पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफीची आश्वासन दिले होते व जनता अजून शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहे तसेच 2022 च्या अतिवृष्टीचे पैसे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही 2024 खरीप रब्बी चा मंजूर झालेला पिक विमा अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा नाही अकोला जिल्ह्यात पाणी बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा प्रीमियम मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे तो फरक दुरुस्त करून घेण्यात यावा कारण महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो तरीसुद्धा या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा प्रीमियम यामध्ये खूप तफावत आहे अकोला जिल्ह्यामध्ये 560 रुपये हेक्टर व बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1160 रुपये हेक्टर याची शासनाने दखल घ्यावी तसेच रोजगार हमी अंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मस्टर अजूनही कृषी विभाग काढत नाही सोयाबीन पिकांवर अमरवेलाचा आणि हुमणी अळीचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आला आहे यावर नियंत्रण करणे शेतकऱ्यांच्या आटोक्याबाहेर झाले आहे जसे कपाशीवरील बोंडअळी लाल्याला मदत मिळे त्या सारखी मदत सोयाबीन पिकाला देण्यात यावी अन्यथा तीव्र प्रकारचे आंदोलन राष्ट्रीय किसान काँग्रेस छेडेल याकरिता राष्ट्रीय किसान काँग्रेस यांच्या वतीने निवेदन देण्यात आले उपस्थित संतोष भाऊ राजनकर राजेभाऊ वानखडे सतीश भाऊ टाकळकर बाळासाहेब डोसे अभय मारोडे किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर पाटील अविनाश झाडोकार हरिदास ताथोड प्रकाश साबे योगेश बाजोड नारायण बोरवार संजय अवचार अरुण निंबुळकर गणेश खिरोळकर प्रशांत गावंडे गजानन भारसाकडे अरविंद गिरे अविनाश पुंडे आकाश बोरसे वामन बोरसे राजेश गव्हाडे बाबुराव लटके व तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments