Advertisement

पळशी झाशी ग्रामपंचायत,तसेच समता फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न.....

पळशी झाशी ग्रामपंचायत,तसेच समता फाउंडेशन व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न.....
     दिनांक 21 नोव्हेंबर शुक्रवार दिवशी ग्रामपंचायत कार्यालय पळशी येथे सरपंच सौ प्रियंका राहूल मेटांगे, व ग्रामपंचायत पळशी झाशीच्या पुढाकाराने भव्य नेत्र तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते, 
    शिबिरामध्ये एकूण 176 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यामधून चाळीस रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला, मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची समता फाउंडेशन मार्फत दिनांक 28 नोव्हेंबर रोजी मोतीबिंदू शास्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव खान्देश या ठिकाणी करण्यात येणार आहे, यामध्ये रुग्णांना ने आण करणे, राहणे व जेवणाची सर्व व्यवस्था समता फाउंडेशन मार्फत करण्यात येणार आहे. 
       सदर तपासणी ही डॉक्टर विजय पांडुरंग शिरसाट यांच्या मार्फत करण्यात आली तर समता फाउंडेशनच्या टीम मध्ये राम वाघ कार्तिक चराटे होते, सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर स्वप्निल मारोडे हर्षल तांगडे प्रफुल करांगळे यांनी मेहनत घेतली
     यावेळी डॉक्टर विजय शिरसाट सर तसेच त्यांच्या टीमचा सचिव हेमंत देशमुख यांच्या हस्ते ग्रामपंचायत मार्फत सत्कार करण्यात आला

Post a Comment

0 Comments