राणा लकी सानंदा स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती संपन्न*
स्थानिक राणा लकी सानंदा एज्युकेशनल शॉवर मध्ये राजमाता मा जिजाऊ जयंती व युवा दिवस स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या उत्साहात शाळेचे अध्यक्ष राणा अशोक कुमारजी सानंदा, प्राचार्य संजय शर्मा सर, शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग यांचे उपस्थितीत साजरा करण्यात आला.
प्रथम मान्यवरांनी राजमाता मा जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी शिक्षिका विधी काळे, रेणुका चोपडे व पंकज बेलोरकर यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकून मौलिक मार्गदर्शन करून यशोगाथा सांगितली.
मा जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सुसंस्कारित करून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढा देण्याचे धडे दिले. राजमाता जिजाऊ यांच्या आदेशाचे पालन करून शिवाजी महाराजांनी लढा दिला व स्वतंत्र मिळवून दिले.
परस्त्री मातेसमान असते असा मौलिक सल्ला सुद्धा आपणा सर्वांना दिला. तसेच स्वामी विवेकानंद यांनी फार मौलिक कार्य करून समाजाला दिशा दाखवून संपन्न कसे व्हावे हे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात राणा अशोक कुमारजी सानंदा यांनी मा जिजाऊ यांचा व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. तसेच त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शिक्षक, शिक्षिकांना आवर्जून सांगितले की, विद्यार्थी तथा युवा पिढी घडविण्याचे पवित्र कार्य तुम्हाला लाभलेले आहे. त्यांना प्रामाणिकपणे घडवण्याचे पवित्र कार्य तुमच्या हातून घडो असे म्हणत जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षिका शिल्पा देशमुख यांनी गगनभेदी घोषणा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन प्राचार्य संजय शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षिका शिल्पा देशमुख यांनी मानले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*
0 Comments