Advertisement

राणा लकी सानंदा स्कूल मध्ये विद्यार्थी शपथ संपन्न**खामगांव /(संतोष आटोळे)

* *राणा लकी सानंदा स्कूल मध्ये विद्यार्थी शपथ संपन्न*
*खामगांव /(संतोष आटोळे)*
               राणा लकी सानंदा स्कूलमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या प्रगती मध्ये वाढ  होण्याच्या दृष्टीकोनातून व शालेय वातावरण अगदी शिस्तप्रिय ठेवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी निवड करण्यात आली. 
 यामध्ये स्कूल हेड बॉय रुद्र सिंग जाधव, हेड गर्ल वैभवी वरुडकर तसेच  विद्यार्थ्यांचे  चार हाऊस मध्ये विभाग करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी हाऊस कप्तान एकता वर्मा, महाराणा प्रताप भाऊ सानवी बोदडे, भगतसिंग हाऊस कप्तान धनीका घट्टे, तर  वीर सावरकर हाऊस कप्तान म्हणून अनुष्का डाबेराव यांची निवड शाळेचे अध्यक्ष राणा अशोककुमारजी सानंदा, प्राचार्य संजय जी शर्मा सर, शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग यांचे उपस्थितीत शिस्तप्रिय शपथ घेऊन, मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्त विद्यार्थी,विद्यार्थिनींना बॅच बिल्ला देऊन गौरविण्यात आले.

            कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन संजय शर्मा सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. 
            कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षिका शिल्पा देशमुख व निधी सांगळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments