*शोषित,पिडीत,वंचित समाजाला समता,स्वातंत्र्य, बंधुता या मानवी हक्कांची जाणीव करून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता -डॉ.ऊर्मिलाताई ठाकरे*
*दि.31 जानेवारी 2026 रोजी स्थानिक पत्रकार भवन बुलढाणा येथे आंबेडकरी चळवळीच्या पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.*
*सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*
*प्रास्ताविक रिपब्लिकन न्यूज पेपर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.एस.पी.हिवाळे यांनी केले.*
*या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नती वृत्तपत्रकाचे संपादक प्रकाशभाऊ पोहरे हे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून वनश्री डॉ.ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांची उपस्थित होती.ऊर्मिलाताई आपल्या भाषणात म्हणाल्या की, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतील पत्रकारिता ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असल्याने बहिष्कृत,शोषित, पिडीत,वंचित वर्गातील जनतेच्या सुखदुःखाची त्यांना पर्वा नाही.त्यांच्या हक्कांचा लढा लढण्यासाठी,समता,*
*स्वातंत्र्य,बंधुता, या मानवी हक्कांची जाणीव करून* *देण्यासाठी बाबासाहेबांनी*
*३१ जानेवारी १९२० रोजी मूक समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी 'मूकनायक', तर 'बहिष्कृत भारत' (चळवळीचे मुखपत्र) ३ एप्रिल १९२७, घ्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर भाष्य केले तर*
*'समता'(समता सैनिक दलाचे मुखपत्र) २९ जून १९२८ तर 'जनता' २४ नोव्हेंबर १९३० पुढे जनता वृत्तपत्राचे नाव बदलून ४ फेब्रुवारी १९५६ रोजी 'प्रबुद्ध भारत' हे वृत्तपत्र काढून वंचितांच्या प्रश्नांना व्यासपीठ दिले व समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचा प्रसार केला.*
*क्रमशः अध्यक्षीय भाषणात प्रकाश भाऊ पोहरे म्हणाले की, डॉ.आंबेडकरांनी स्विकारलेला बौद्ध धर्म सर्वोत्तम धर्म आहे.या धर्माचे सर्वांनी आपल्या जीवनात आचरण करावे,तरचं बाबासाहेबांच्या विचारांचे परिवर्तन होईल*
*प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे, प्रा.गजेंद्र गवई*
*रणजीतसिंग राजपूत,प्रा.सुभाष लहाने, कु.मृणाल सावळे,आकाश हिवाळे,भानुदास लकडे,सौ.सुनिता काकडे,राजू आवारे,निकाळजे, रवी भोंडे...आदि मान्यवर उपस्थित होते.*
*याप्रसंगी कार्यक्रमाचे संचलन,आभार प्रदर्शन व आयोजन प्रा.भास्कर इंगळे यांनी केले.*
*यावेळी शिव,शाहू, फुले, आंबेडकर चळवळीतील विचारवंत व प्रतिष्ठित नागरिक यांची बहुसंख्येने उपस्थित होती.*
0 Comments