*महाशिवरात्री निमित्त २५ किलो भरीव पितळेच्या त्रिशूळाची भव्य स्थापना तथा फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन*
छत्रपती शिवाजी महाराज वेस, खामगाव येथील श्री शिव खंडोबा संस्थानमध्ये महाशिवरात्री निमित्ताने रविवार, १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी विधिवत पूजा-अर्चेसह २५ किलो वजनाच्या भरीव पितळेच्या त्रिशूळाची भव्य स्थापना करण्यात येणार आहे.
या पावन प्रसंगी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून फराळ व चिवड्याचे वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रम सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणार असून भाविकांसाठी दर्शनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ व श्री शिव खंडोबा भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांनी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0 Comments