Advertisement

. पू. श्री सुधांशुजी महाराज यांच्या सत्संग स्थळी भूमिपूजन कार्यक्रम संपन्न*खामगांव/(संतोष आटोळे

*प. पू. श्री सुधांशुजी महाराज यांच्या सत्संग स्थळी भूमिपूजन कार्यक्रम संपन्न*
खामगांव/(संतोष आटोळे)  परमपूज्य सुधांशू महाराज यांच्या सुमधुर वाणीतून सत्संग कार्यक्रम  दिनांक 23 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सभा मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नगर परिषद मैदान, खामगांव येथे दिनांक 17/02/2025 रोजी संपन्न झाला.  सदर कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून खामगांव नगरीच्या  नगराध्यक्षा  सौ. अपर्णाताई सागर फुंडकर,  श्री उत्तमचंद जी गोयंका उद्योजक खामगाव यांच्या शुभहस्ते पार पडले

.
      कार्यक्रमाचे यजमान श्रीमती कलावती ताई मोरे, शिवाजी वानखेडे नागपूर, श्री अमितजी गोयनका,प्रधान श्री वामन लिखारे,सचिव श्री राजेशजी झापर्डे, श्री बाबुलालजी चुडीवाले, श्री कमल किशोरजी मंत्री,श्री मुरलीधर जी उपाध्याय, श्री भीमसेनजी भागदेवाणी यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आहेत तरी या सनातन भक्ती संगम सत्संगाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती विश्व जागृती मिशन खामगाव मंडळ महाराष्ट्र यांच्या तर्फे केली आहे.

Post a Comment

0 Comments