*राष्ट्रवादी काँग्रेस चषक क्रिकेट स्पर्धेत केजीएन क्रिकेट क्लब ठरला विजेता*
*राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते 51000 हजार रुपयांचे बक्षीस प्रदान*
खामगाव /(संतोष आटोळे) तालुक्यातील कंझारा येथील केजीएन क्रिकेट क्लबच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस क्रिकेट चषक 2026 या जिल्हास्तरीय टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धेचे राणा स्टेडियम कंझारा येथे या स्पर्धेला दि.12 फेब्रुवारीपासुन प्रारंभ झाला होता. या क्रिकेट स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील एकुण 16 संघांनी सहभाग घेतला.दि.16 फेब्रुवारी 2026 रोजी राणा चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतीम सामना खेळला गेला. अंतीम सामना केजीएन क्रिकेट संघ विरुध्द ताज क्रिकेट क्लब खामगाव ग्रामीण या दोन संघामध्ये खेळला गेला.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी अंतीम सामन्याला उपस्थित राहुन खेळाडुंसोबत परिचय करुन घेतला.तद्नंतर नाणेफेक होवुन अंतीम सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यामध्ये केजीएन क्रिकेट संघ कंझाराने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 8 षटकाच्या या सामन्यामध्ये केजीएन क्रिकेट क्लब कंझाराने 3 गडी गमावुन 92 धावा काढल्या.केजीएन क्रिकेट संघातर्फे मोहसीन कुरेशी याने 20 चेंडूमध्ये 35 धावा काढल्या. तर शोहेब याने 5 चेंडु मध्ये 23 धावा काढल्या. 93 धावांचे विजयी उदिद्ष्ट गाठतांना खामगाव ग्रामीणचा ताज क्रिकेट संघ हा अवघ्या 40 धावांमध्ये ऑलआऊट झाला. केजीएन संघातर्फे फरदीन याने 5 गडी बाद करुन केजीएन संघाला अंतीम सामन्यात एकतर्फी विजय मिळवुन दिला.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष बिलाल खान पठान,नगरसेवक तहेसीन शाह, अजीम कुरेशी, डॉ.आकाश इंगळे, मुकदद्र खान, हिदायद खान सैयद इमरान,अंजुम पठान,रियाकत अली,आसीफ खान आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी आयोजकांच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह सर्व मान्यवरांचा पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस क्रिकेट चषक 2026 च्या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेल्या केजीएन क्रिकेट संघ कंझाराला प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपयांचे बक्षीस माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर उपविजेता ठरलेल्या खामगाव ग्रामीण येथील ताज क्रिकेट संघाला द्वितीय क्रमांकाचे 31 हजार रुपयांचे बक्षीस खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे यांच्या वतीने देण्यात आले. तसेच स्पर्धेमध्ये बेस्ट बॅस्टमॅन,बेस्ट बॉलर व मॅन ऑफ द सीरीज यासारखे व्यक्तीगत बक्षीसे सुध्दा खेळाडुंना देण्यात आली.स्पर्धेचे पंच म्हणुन मो.खालील मो.नाझीम, तर गुण लेखक म्हणुन सुर्यकांत इंगळे आणि समालोचक म्हणुन आरीफ टेलर यांनी काम पाहिले.राष्ट्रवादी काँग्रेस क्रिकेट चषक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहम्मद मुददसर,मो.शाकीर, सादिक खान, राजा खान,नोशाद खान,मोहम्मद नाझीद,बशारत खान, मोहम्मद सोहेल,मोहम्मद फरदीन यांच्यासह कंझारा येथील केजीएन क्रिकेट क्लबचे पदाधिकारी,खेळाडु व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
0 Comments