Advertisement

कृषी निविष्ठा विक्रेते वकृषीमित्र परिवार यांच्या वतीन रक्तदान शिबिर संपन्न..सौ गिता सोनोने

कृषी निविष्ठा विक्रेते व
कृषीमित्र परिवार यांच्या वतीन रक्तदान शिबिर संपन्न..सौ गिता सोनोने 

जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील कृषी प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या संयुक्त विद्यमानाने कृषी स्नेहसंमेलन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक ११ मार्च २०२६ रोजी माळी समाज मंगल कार्यालय संग्रामपूर येथे  उत्साहात पार पडले. या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य बजावले. कृषी मित्र प्रतिनिधी व कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या वतीने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सागर भैया, तर उद्घाटक शिवशंकर घिवे, कृष्णा राठी, राम लढ्ढा, गजानन नागळे, सुरेश अंबडकार, प्रफुल्ल कावरे, अतुल भोपळे,विजय हिस्सल, प्रमोद देशमुख,संजय चोपडे हे होते. तसेच यावेळी लकी ड्रॉ मार्फत ११ कंपनी प्रतिनिधींना हेल्मेटचे वाटप करण्यात आले रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे ही बाब लक्षात घेऊन मित्र परिवाराच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते 


या शिबिरात ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, डॉ हेडगेवार रक्त केंद्र अकोला यांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गाने यासाठी सहकार्य केले तर कृषी मित्र परिवाराच्या वतीने सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, तर प्रस्तावना सोपान घुले यांनी व संचालन उमेश बावणे साहेब यांनी केले,संपूर्ण शिबिराच्या यशस्वीतेसाठी 


सोपान घुले, रोशन क्षीरसागर ,अमोल सोयस्कर, संजय शेळके, उज्वल पांढरकर,  ज्ञानेश्वर ताठर, वसुलकर साहेब,भास्कर फुंडकर, रोशन क्षीरसागर,ज्ञानेश्वर उभे,अक्षय गोतमारे, त्यांच्यासह कृषी मित्रपरिवारने अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments