*युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
सक्षम भारतासाठी महीला सशक्तिकरण अत्यावश्यक --- गोपाल अग्रवाल सर
खामगाव येथील युगधर्म पब्लिक स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष श्री. गोपाल अग्रवाल सर तर मार्गदर्शनासाठी प्राचार्य श्री. अनिरुद्ध सर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रुती लढ्ढा, सौ. निर्मला जाधव मॅडम (शिक्षण विस्तार अधिकारी) आणि सौ. सुनिता गवई मॅडम (विषय तज्ञ, पंचायत समिती खामगाव) यांची विशेष उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राची पवार व स्वरा पवार यांनी आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने केले,
स्वागत गीत सोनाली नगरे मॅडम यांनी गायीले तर आभार प्रदर्शन ईश्वरी बोदडे यांनी केले.
यावेळी प्राचार्य श्री. अनिरुद्ध सर आणि अध्यक्ष श्री. गोपाल अग्रवाल सर यांनी आपले विचार व्यक्त करताना महिला सन्मानाचे महत्त्व अधोरेखित केले. महिला दिन केवळ एक दिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता महिलांचा सन्मान व आदर दररोज केला पाहिजे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वंशिका गवई, नूतन मोरखडे, स्वरा वाकोडे तसेच इयत्ता पहिलीतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि इयत्ता पाचवीतील सर्व मुलींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन व पेढे भरवून सन्मान केला आणि महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या शिक्षकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंददायी व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
0 Comments