*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवु...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
मौजे आवार येथे 10 लक्ष रुपये खर्चाच्या नाली बांधकामाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते भूमिपूजन
खामगाव(संतोषआटोळे )
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या शिफारशीवरुन बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी बुलढाणा जिल्हा नियोजन समितीकडुन खामगाव विधानसभा मतदार संघासाठी तब्बल 20 कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून ज्या गावांमध्ये विकासकामांची निकड आहे अश्या ठिकाणी रस्ते,नाली यासह विविध विकासकामे केली जात आहे. भविष्यातही महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून अधिक विकास निधी आणुन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या शिफारशीनुसार खामगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांकरीता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध शिर्षकाखाली कोटयावधी रुपयांचा निधी मंजुर केला असुन त्या निधीतून शनिवार दि.04 एप्रिल 2026 रोजी मौजे आवार येथे 10 लक्ष रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या नाली बांधकामाचे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे,जामुवंतराव देशमुख, नागापुरचे सरंपच कैलास वासनकार,विठठ्ल धानोरे,वैभव धानोरे,हरिभाऊ पेसोडे,आवार ग्राम सेवा सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव वैतकार,सरपंचपती दिलीप गवई,उपसरपंच विश्वनाथ वैतकार,ग्राम पंचायत सदस्य आनंद गवई,उपसरपंच गुलाब निंबाळकर,विष्णु महाराज गाडगे,मनोहर लोणाग्रे आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचे आवार गावात आगमन झाले असता ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताश्यांच्या निनादात उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. तद्नंतर माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते कुदळ मारुन व फीत कापून जिल्हा वार्षिक ग्रामीण योजना 2025-26 अंतर्गत 10 लक्ष रुपये खर्च करुन मनोहर लोणाग्रे यांच्या घरापासुन ते डॉ.मंगेश वैतकार यांच्या कृषी केंद्रापर्यंत बांध्ाण्यात येणाऱ्या नाली बांधकामाचे भुमिपुजन करण्यात आले. याप्रसंगी आवार ग्रामस्थांच्या वतीने गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याबदद्ल माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल व पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो,आम्ही सर्व सुनेत्राताई पर्व अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गणेश खराटे,शेख रियाज भाई,शरीफभाई, भगवान भिसे,भानुदास ढगे,प्रमोद पाटील, विनोद सोळंके,भागवत सोळंके,रघुनाथ मुयांडे,रामेश्वर बेंडोकार,गोवर्धन भिसे,योगेश खराटे,संतोष साबे, संतोष लोणाग्रे,विनोद खराटे,श्रीराम निंबाळकर,भगवान भिसे,पांडुरंग खेकडे,गणेश निंबाळकर,सुरज गवई,गोपाल निंबाळकर,सागर मुयांडे पाटील,भानुदास अंभोरे,विष्णु महाराज गाडगे,वैभव वैतकार यांच्यासह आवार येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments