*न.प. लॉयन्स आय हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त
मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिर संपन्न*
लॉयन्स क्लब खामगांव अंतर्गत लॉयन्स क्लब सव्र्हस ट्रस्ट व्दारा संचालित न.प. लॉयन्स
आय हॉस्पीटल खामगांव चे १० व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. ०८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी
१० ते दु. २ दरम्यान स्थानिक नगर परिषद लॉयन्स आय हॉस्पिटल खामगांव येथे भव्य मोफत नेत्र
तपासणी व मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन
प्रसंगी मंचावर लॉयन्स क्लब सव्र्हस ट्रस्ट चे अध्यक्ष माजी प्रांतपाल लॉ. डॉ. अशोक बावस्कर, ट्रस्टचे
कोषाध्यक्ष लॉ. तुषार कमाणी, ट्रस्टी लॉ. उज्वल गोयनका, लॉ. धर्मेश शहा, लॉ.डॉ. केशव मेंढे, लॉ.
आर.जी. भुतडा, लॉ. संजय पुरोहित, लॉ. किशोर गरड, क्लब सचिव लॉ. डॉ. गिरीश पवार तसेच
सुप्रसिध्द नेत्र तज्ञ लॉ. डॉ. संजीव राठोड, नेत्रतज्ञ लॉ. डॉ. सुरेखा मेंढे, लॉयन्स आय हॉस्पिटलच्या
नेत्रतज्ञ डॉ. राजश्री वानखडे यांची उपस्थिती होती.
लॉयन्स ट्रस्टचे अध्यक्ष लॉ.डॉ. अशोक बावस्कर यांनी मागील १० वर्षाच्या न.प. लॉयन्स
आय हॉस्पिटलच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच भविष्यात आय हॉस्पिटलमध्ये अधिक
चांगल्या सुविधा व अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करुन देण्याचा मानस व्यक्त केला. उपस्थित सर्व
नेत्रतज्ञ व आय हॉस्पिटलचा स्टाफ यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी
लॉयन्स क्लब खामगांवचे सदस्य, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक तथा पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
या शिबिरात सुमारे ७० नेत्र रुग्णांची तपासणी सुप्रसिध्द नेत्र तज्ञ लॉ. डॉ. संजीव राठोड,
नेत्रतज्ञ लॉ. डॉ. सुरेखा मेंढे, लॉयन्स आय हॉस्पिटलच्या नेत्रतज्ञ डॉ. राजश्री वानखडे व लॉयन्स आय
हॉस्पिटलच्या स्टाफ व्दारे करण्यात आली. शिबिरात १२ गरजु रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली कार्यक्रमाचे संचालक प्रकल्प प्रमुख लॉ.धर्मेश शाह तसेच आभार प्रदर्शन प्रकल्प प्रमुख लॉ.उज्वल गोयनका यांनी केले अशी माहिती लायन्स क्लब सर्विस ट्रस्टचे सचिव लॉ.अशोक केला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
0 Comments