*देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीला उत्तर प्रदेशातील गाजीपुर नंदगज येथे अपघात;अकोला आणि बुलढाणा जिल्हयातील दोन महिलांचा मृत्यू*
*केंद्रियमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य आणि जिल्हा प्रशासनाशी साधला संपर्क*
*जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे केले निर्देशीत तर दिल्लीहुन एक चमुही अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना*
*बुलढाणा दि.9:* काशि विश्वनाथ दर्शनासाठी नेपाळकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील यात्रेकरुंच्या बसचा वाराणसी-गोरखपुर महामार्गावरील गाजीपुर जवळ अपघात होऊन या अपघातात दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यु झाला आहे. यातील एक महिला बुलढाणा जिल्हयातील तर दुसरी महिला अकोला जिल्हयातील रहिवाशी आहे. तर अपघातात 38 भाविक जखमी झाले आहे. जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात उपचारास्तव दाखल केले असुन अपघाताची माहिती मिळताच केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब9 कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधुन जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशित केले.
जय श्रीराम टुर्स एँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या वतीने आयोजीत देवदर्शन पर्यटन यात्रे निमीत्त महाराष्ट्रातील 38 भाविक अयोध्या व इतर तिर्थक्षेत्र दर्शनाकरीता निघाले होते. आज 9 एप्रिल रोजी यात्रेकरु भाविकांची बस वाराणसी-गोरखपुर या महामार्गाने मार्गक्रम करत असतांनाच सकाळी 11.30 च्या सुमारास उत्तर प्रदेशातील गाजीपुर जवळील नंदगज येथे बसचा अपघात घडला. या अपघातामध्ये 2 महिलांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोला येथील 50 वर्षीय अन्नपुर्णाबाई तर बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील रोहिणखेड येथील सरस्वतीबाई पाखरे यांचा समावेश आहे. उर्वरीत 35 यात्रेकरु या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींना वैद्यकिय महाविद्यालयात उपचारास्तव दाखल केले आहे. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर उर्वरीत 32 यात्रेकरु किरकोळ जखमी आहेत.
अपघातीची माहिती मिळताच केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकारडे संपर्क साधला व अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले. केंद्रिय मंत्र्यांनी एवढयावरच न थांबता तेथील जिल्हाधिकारी दिनेश कुमार, सिएमओ डॉ.सुनिल पांडे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधुन जखमींना तात्काळ मदत करण्याचे सुचना दिल्या. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांचे सहाय्यक खाजगी सचिव डॉ.गोपाल डिके, आचल भाटीया हे घटनास्थळी हे मदतीसाठी गाजीपुर कडे रवाना झाले आहेत. तर दिल्ली येथील मंत्रालयातुनही संबधितांना निर्देशित करुन अपघातग्रस्तांना मदत करण्याचे काम केल्या जात आहे.
00000
0 Comments