*भ.श्री.परशुराम जन्मोत्सवाची सभा सोत्साह संपन्न* *कार्याध्यक्ष पदी रवि जोशी*
_दरवर्षी प्रमाणे यंदाही *दि.१९_ एप्रिल रोजी भ. श्री परशुराम जन्मोत्सव* _मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असुन त्या निमित्य पुर्वतयारी करण्याच्या दृष्टीने दि.४ अप्रैल रोजी स्था. मुक्तेश्वर आश्रम येथे भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे सभेचे आयोजन करण्यात आले होते. *_ सभेचे अध्यक्षस्थान समाजाचे जेष्ठ माधवराव जोशी व मोहनलालजी शर्मा,यांनी भुषविले होते.* *सभेमध्ये जन्मोत्सवा निमित्य राबविण्यात येणाऱ्या विविध धार्मिक, सामाजिक,सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात आली.सर्वप्रथम* *मान्यवरांच्या हस्ते भ.परशुरामांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन करुन माल्यार्पण करीत आरती* *करण्यात आली,गायत्री मंत्र, ओमकार मंत्र, दत्तात्रय जप,राम नामाचा जप,हनूमान चालीसा पठण याद्वारे सभेला सुरुवात झाली.सभेत भ.श्री.परशूराम जन्मोत्सव २०२६ ची समीती गठीत* *करण्यात आली यामध्ये अध्यक्ष पदी शेखरभाऊ पुरोहित, कार्याध्यक्ष :- रवि जोशी, उपाध्यक्ष:- आशिष सराफ, सत्यनारायण थानवी, सचिन* *चांदुरकर, कैलास बेरोज्या,सचिव :- अमोल जोशी, अभी धनवी, स्वप्निल महर्षी ,मोहन पुरोहित, कोषाध्यक्ष:- शंभू शर्मा सह कोषाध्यक्ष :-सचिन पाठक* *मार्गदर्शक म्हणून
मोहनलालजी शर्मा, माधवराव जोशी, संजय शर्मा, ओम शर्मा, शैलेश शर्मा, अँड .शेखर जोशी, दामोधर पांडे, अँड .उदय आपटे, अँड .चैतन्य जोशी, प्रल्हादभाऊ शर्मा, विजय शर्मा, नरेंद्र पुरोहित,* *प्रसाद डोरले यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली तसेच* *दि. १९ एप्रिल रोजी रोजी सकाळी ठिक 9 वा.भ.परशुराम व्यायाम शाळेत पुजन व आरती करुन भव्य स्कुटर रॅलीचे आयोजन व समारोप महाराष्ट्रीयन ब्राह्मण सभा येथे महाआरतीने, यानंतर ठीक ११ वा. वीर हनुमान मंदिर फरशी येथील गौ शाळेत मातृशक्ती तर्फे गौ मातेस गौ ग्रास व पुजन करुन,दू.१२ वा. सामान्य रुग्णालय येथे ब्रह्म युवा शक्ती तर्फे रुग्णांना फळ व बिस्कीट वितरण करण्यात येणार आहे. नंतर सायंकाळी ठिक ५ वा. सत्यनारायण मंदिर येथून पारंपारिक वाद्यासह दिंडी,अश्व, उंट , विविध् झांकी व आकर्षक रथांसह भव्य शोभायात्रा काढून शोभायात्रेचे समारोप राजस्थानी ब्राह्मण भवन येथे महाआरती ने होणार आहे.असे सर्वानुमते ठरविण्यात आले.* *सभेचे संचालन शंभू शर्मा तर प्रास्ताविक आशिष सराफ व रवि जोशी तसेच आभार प्रदर्शन सचीन चांदूरकर यांनी केले.सभेत भ.श्री.परशुराम जन्मोत्सव समितीचे सर्व* *पदाधिकारी व ब्रह्मवृंद मोठ्या संख्येने* *उपस्थित होते*
*तरी भ.परशुराम जन्मोत्सवा निमित्य आयोजीत शोभायात्रा व सर्व कार्यक्रमांना समस्त ब्रह्म्वृंदांनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने* *उपस्थित राहावे असे आवाहन भ.श्री परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे करण्यात आले आहे*
0 Comments