Advertisement

विश्व नवकार दिनानिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिल्या शुभेच्छा* खामगाव/(संतोष आटोळे )

*खामगावात सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने विश्व नवकार महामंत्राचे जप*
*विश्व नवकार दिनानिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिल्या शुभेच्छा*
  खामगाव/(संतोष आटोळे )  जैन समाजाच्या जितो संघटनेच्या वतीने विश्व नवकार महामंत्र दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गुरुवार दि.09 एप्रिल 2026 रोजी जगभरात 108 पेक्षा जास्त देशांमध्ये लाखो भाविकांनी एकाच वेळी नवकार मंत्राचा जप करुन विश्व शांतीचा संदेश दिला.खामगाव शहरामध्ये सुध्दा सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने विद्या समय गुरु यांच्या आशिर्वादाने पुज्य मुनीश्री अक्षय सागरजी महाराज यांच्या प्रेरणेने पुज्य मुनीश्री अजय सागरजी व मुनीश्री उपशम सागरजी महाराजांच्या सानिध्यात विश्व नवकार महामंत्र दिवसानिमित्त महावीर भवन येथे सकाळी 8 ते 9.30 वाजेपर्यंत सामुहिकरित्या विश्व नवकार महामंत्राचे जप करण्यात आले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, श्री चंद्रनाथ प्रभु दिगांबर जैन संस्थाने मॅनेजींग ट्रस्टी अजय गोधे,राजेंद्र बडजाते, कांतीलाल पगारिया, विशाल कासलीवाल, चवरे साहेब,सचिन गोधे  आदींची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन सकाळी 8 ते 9.30 वाजेपर्यंत विश्व नवकार महामंत्राचा सामुहिक जप करण्यात आला.
यावेळी पुज्य मुनीश्री अजय सागरजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की,  जैन धर्मामध्ये विश्व नवकार महामंत्राला सर्वात शक्तीशाली आणि कल्याणकारी महामंत्र मानले जाते. विश्व नवकार महामंत्र हा अनाधी काळापासुन ते अनंत काळापर्यंत जपला जाणारा महामंत्र आहे.हा मंत्र केवळ जैन धर्माचा नसुन तो अरिहंत,सिध्द,आचार्य,उपाध्याय आणि सर्व साधुंच्या गुणांना वंदन करणारा वैश्वीक मंत्र मानला जातो. जो सर्व पापांचा नाश करतो. या सामुहिक प्रार्थनेद्वारे पर्यावरणाचे शुध्दीकरण आणि सकारात्मक उर्जेचा प्रसार करुन जागतिक शांतता,अंहिसा आणि अध्यात्मिक संवाद वाढविणे हा या मागील उदद्ेश आहे, दरवर्षी जगभरात जैन समाज बांधवांसह लाखो लोक  एकत्र येवुन नवकार मंत्राचा जप करतात असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह सकल दिगंबर जैन समाज संघटनेच्या सदस्यांनी पुज्य मुनीश्री अजय सागरजी व मुनीश्री उपशम सागरजी महाराज यांचा श्रीफळ देवुन स्वागत केले.यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी जैन समाज बांधव-भगिणींना विश्व नवकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला जैन समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल दिगंबर जैन संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments