Advertisement

​जळगांव जामोदमध्ये गॅससाठी रांगाच रांगा; सर्व्हर डाऊनमुळे ग्राहकांचे ऐन उन्हात हाल.. सौ गीता सोनोनेजळगांव जामोद

​जळगांव जामोदमध्ये गॅससाठी रांगाच रांगा; सर्व्हर डाऊनमुळे ग्राहकांचे ऐन उन्हात हाल..!
सौ गीता सोनोने
जळगांव जामोद 

बुधवार दिनांक १ एप्रिल रोजी जळगाव जामोद शहरात गॅस सिलिंडरसाठी तालुक्यातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. पहाटे चार वाजेपासूनच गॅस एजन्सीसमोर सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. एकीकडे कडाक्याचे ऊन आणि दुसरीकडे तांत्रिक बिघाड अशा कात्रीत सामान्य जनता अडकली आहे.​ सकाळपासूनच इंडियन ऑईलचे (आयओसीएल) सर्व्हर डाऊन झाल्याने वितरण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. सर्व्हर बंद असल्यामुळे गॅस एजन्सीला सिलिंडरचे बुकिंग आणि वितरण करणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य झाले. याचा फटका शेकडो ग्राहकांना बसला. पहाटे चार वाजता, जेव्हा सूर्यही उगवला नव्हता, तेव्हापासून हातातील कामे सोडून नागरिक एजन्सीवर रांगेत उभे होते. मात्र, दुपारी एक वाजेपर्यंत तासनतास उलटूनही सर्व्हर सुरू न झाल्याने नागरिकांचा संयम सुटला होता.​सध्या विदर्भात उन्हाचा पारा चांगलाच चढलेला आहे. दुपारच्या वेळी नागरिक उन्हात बसून लाहीलाही होत होते. त्यातच गॅस एजन्सी परिसरात सुविधाचा आभाव असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला तासनतास उन्हात ताटकळत उभ्या असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.​सर्व्हर बंद पडल्याची पूर्वसूचना नसल्याने नागरिकांनी गर्दी केली. सकाळ पासून रांगेत उभे राहूनही शेवटी रिकाम्या हाताने परत जाण्याची वेळ ग्राहकांवर आली होती.​एका सर्व्हरमुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे जगणे कसे मुश्किल होऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. आता गॅस एजन्सी चालक आणि संबंधित कंपनी यावर काय तोडगा काढतात आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.


​"आम्ही पहाटेपासून चहा-नाश्ता न करता इथे रांगेत उभा आहोत. घरचा गॅस संपलाय, स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्न आहे. वरून उन्हाचा त्रास होतोय आणि इथे गॅस एजन्सी वरील सुविधाच्या आभावाकडे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे."

Post a Comment

0 Comments