*'ताक' रुपी संजीवनीचे वितरण करणारे श्री मानकुंवरबेन लालचंद दोशी छाचकेंद्र*
*ताक वितरणाचा उपक्रम सेवाभावाचे जिवंत उदाहरण*
*खामगाव (संतोषआटोळे )* गेल्या ५०वर्षापासून अखंडपणे ताक रुपी संजीवनी मोफत वितरण करून उन्हाच्या दिवसात मानवतेचा गारवा देण्याचे कार्य येथील वसंतवाडी भागातील श्री मानकुंवरबेन लालचंद दोशी छाच केंद्र करीत आहे.हा केवळ उपक्रम नाही तर सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात ताक रुपी संजीवनी चे मोफत वितरणाचे कार्य गत ५० वर्षापासून श्री मानकुंवरबेन लालचंद दोशी छाच केंद्राच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या केंद्राचे पदाधिकारी हे जात, पात,धर्म,पंथ याचा भेदभाव न करता सर्वांना ताकाचे वितरण करीत आहे.या माध्यमातून सेवा, समर्पण व सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवीत आहे. इंदौर येथील बाबुभाई शहा यांच्या छास केंद्राच्या कार्याने प्रेरित होऊन खामगाव येथील लालचंदभाई दोशी,जीवनलाल मेहता, गिरधरभाई मेहता व मनसुखभाई कमाणी ताराचंद खिलोशीया आदी मंडळींनी 1975 साली इंदौर येथे जाऊन तेथील ताक वितरण केंद्राची संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी खामगाव येथे छास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.1976 साली मंडळाची स्थापना केली.आणि या मंडळाच्या माध्यमातून ताक वितरणाला 1976 साली सुरुवात केली. सुरुवातीला 20 किलो दुधाच्या पासून दही बनवून त्याचे ताक बनविण्यात आले होते.ताक बनविण्यासाठी मशीन नसल्याने श्रीमती जयाबेन संघराजका, मानकुंवरबेन दोशी व जयाबेन मेहता या महिला सकाळी ६ वाजता रवीच्या साह्याने दही घुसळून ताक तयार करायचे त्याचे वितरण करण्यासाठी व ताक बनविण्यासाठी येथील विधीज्ञ भडंग यांनी त्यांच्या घरातील एक खोली
विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. दरवर्षी ताकाचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढतच गेली एवढ्या मोठ्या प्रमाणात ताक हाताने बनविणे शक्य नसल्याने गुजराथ येथून ताक बनविण्याची मशीन आणण्यात आली. या माध्यमातून ताक तयार करण्यात येत होते.या कार्यात मनसुखभाई कमाणी,महेंद्रभाई शहा,तुकाराम माने,लालचंद दोशी,जीवनलाल मेहता, मूलचंदभाई कमाणी,नगीनभाई मेहता,जगदीश संघराजका, ताराचंदभाई खिलोशिया,रमेशभाई दोशी यांनी सेवा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या कार्यात मदतीचा हात दिला आज जे हयात आहेत ते आजही या कार्यात मदत रूपाने सेवा देत आहे.हे विशेष या कार्यात अकोला येथील रोहितभाई दोशी परिवारातील कपिलभाई व राजूभाई दोशी यांचे मोठे योगदान लाभत आहे. आज ताक रुपी वितरणाच्या छोट्याशा लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
*यंदाचा ताक वाटपाचा शुभारंभ रविवारी*
यंदा मोफत ताक वितरणाच्या शुभारंभ 5 एप्रिल 26 रोजी करण्यात येणार आहे.यंदा ७०० कार्डधारकांनी नावाची नोंदणी केली आहे. त्यांना दररोज पहाटे ५ ते ७ या वेळात श्रीमानकुंवरबेन लालचंद दोशी छास केंद्रात ताकाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती छासकेंद्राचे अध्यक्ष महेंद्र भाई शहा यांनी दिली तब्बल दोन ते अडीच महिने या ताकाचे दररोज कार्ड धारकांना वितरण केले जाणार आहे या वितरणाच्या कार्याची धुरा या छास केंद्राचे अध्यक्ष महेंद्रभाई शहा, उपाध्यक्ष प्रफुल कमाणी,सचिव हसमुख कमाणी, कोषाध्यक्ष भिकूभाई संघराजका,सदस्य कीर्ती खिलोशिया, पिनेश कमाणी, कपिलभाई दोशी, विधी सल्लागार अॅड व्ही.वाय. देशमुख व सुनील माने हे सांभाळणार आहे.
0 Comments