Advertisement

समानतेचा संदेश देणारे संत गोरोबा काका यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी* .. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा.संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न खामगांव/(संतोष आटोळे )

*समानतेचा संदेश देणारे संत गोरोबा काका यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी* 
  .. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा.
संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे गोरोबा काकांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 
 खामगांव/(संतोष आटोळे ) बुधवार दि.15 एप्रिल 2026 रोजी गोरोबा महाराज यांच्या 709 व्या पुण्यतिथीनिमित्त घाटपुरी येथील संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी 10 वाजता बालकिर्तनकार हभप वैष्णवीदिदी एकनाथ खांदे,सुटाळा बु. यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी निमित्त  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी गोरोबा महाराज मंदिरामध्ये जावुन संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुतळयाला माल्यार्पण करुन दर्शन घेतले.याव्ोळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खामगाव शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे,संत गोरोबा काका संस्थानचे अध्यक्ष रामभाऊ बेंडोकार, रामेश्वर कापडे,संजय लाहुडकर,विनोद लाहुडकर, संजय खोंड  आदींची उपस्थिती होती.याव्ोळी संत गोरोबा संस्थानच्या वतीने अध्यक्ष रामभाऊ बेंडोकार व निनाजी मांडवेकर,संजय लाहुडकर यांनी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांचा शाल व पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला.


याव्ोळी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, संतश्रेष्ठ गोरोबा काका  यांनी आपल्या साध्या जीवनातुन समाजाला प्रामाणिकपणा,कष्ट आणि भक्तीचा मार्ग दाखविला.समाजातील अंधश्रध्दा,अन्याय या विरोधात आवाज उठवुन संत गोरोबा काकांनी समानतेचा संदेश दिला.त्यांचे जीवन हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी असुन आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे.संत गोरोबा काका संस्थानच्या वतीने दरवर्षी पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्या जाते या माध्यमातून सर्व समाज बांधव समाजाच्या प्रगतीसाठी एकसंघ होत असतात असे सांगुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक केले. 
या पुण्यतिथी कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्रदादा देशमुख,दिलीप पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोरआप्पा भोसले,संभाजीराव टाले,ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्यासह आदी मान्यवरांनी सुध्दा भेटी दिल्या. कार्यक्रमप्रसंगी कुंभार समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा समाजभुषण म्हणुन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन रामेश्वर कापडे यांनी केले.तद्नंतर गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.या महाप्रसादाचा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह शेकडो समाज बांधवांनी लाभ घेतला.
या कार्यक्रमाला श्री संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर समितीचे अध्यक्ष श्री राजाराम बेंडोकर, कुंभार समाजाचे तालुकाध्यक्ष श्री विनोद लाहुडकर, निनाजी मांडवेकर,श्रवण मोरे, रमेशभाऊ खानझोडे,दिनकराव नावकार,गोविंदा लाहुडकार,अंबादास धोटे,सुगदेव कापडे,रामा हिवरकर,बाळुभाऊ लाहुडकार,श्रीकृष्ण वसोकार,कुंभार समाजाच्या महिला बुलढाणा जिल्हाध्यक्षा लंगोटे ताई,खामगाव तालुका अध्यक्षा हिवरकर ताई,सौ.सिमाताई संजय लाहुडकार यांच्यासह कुंभार समाज बांधव-भगिणी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments