धनगर समाजातून पहिल्यांदाच महिला विधानपरिषदेत? विद्याताई मोटे यांचे नाव आघाडीवर
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एक महत्त्वाची चर्चा रंगत आहे. धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यांमध्ये घुमतोय आवाज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी वर्ष व स्त्री शताब्दी वर्ष वर्ष असल्यामुळे धनगर समाजाला आशा लागली आहे महिला बिल सुद्धा पास झाले आहे धनगर समाजातील सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या सौ विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांमध्ये पुढे येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. उच्चशिक्षित सामाजिक व राजकीय कामाचा अनुभव असल्यामुळे या घडामोडीमुळे धनगर समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही वर्षांत धनगर समाजाने आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक प्रतिनिधित्व यांसारख्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील महिलांना राजकारणात संधी मिळावी, अशी मागणीही वाढत होती. त्यातच विद्याताई मोटे यांचे नाव पुढे आल्याने या मागणीला नवे बळ मिळाले आहे.
विद्याताई मोटे या ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी, शिक्षण प्रसारासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर काम करत असल्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत काही राजकीय पक्ष सकारात्मक विचार करत असल्याचे बोलले जात आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर विद्याताई मोटे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती झाली, तर त्या धनगर समाजातून या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला ठरतील. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास घडू शकतो.
दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
धनगर समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी या शक्यतेचे स्वागत केले असून, “समाजातील महिलांना संधी मिळणे ही काळाची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
0 Comments