Advertisement

बोथाकाजी येथे महामानवांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन* खामगाव/(संतोष आटोळे)

*बोथाकाजी येथे महामानवांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन* खामगाव/(संतोष आटोळे)      तालुक्यातील बोथाकाजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १७,१८ व १९ असे तीन दिवशीय विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. १७ एप्रिल रोजी सकाळी धम्म ध्वजारोहण, सामुदायिक बुद्ध वंदना व परित्राण पाठ,रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची तर सायंकाळी भाषण स्पर्धा व बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.१८ एप्रिल रोजी सकाळी सामुदायिक बुद्ध वंदना व परित्राण पाठ यानंतर भिख्खू संघाची



 धम्मदेशना मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत ज्ञानरक्षित महाथेरो संस्थापक अध्यक्ष मैत्रीए चॅरिटेबल ट्रस्ट,भदंत गुणरत्न महाथेरो नंदुरबार, भदंत नागसेन बोधी महाथेरो बुद्ध लेणी संभाजीनगर,भदंत धम्मधर थेरो, आर्याजी प्रा धम्मदर्शना महाथेरो, भदंत संघप्रिय थेरो,भदंत डॉ. हर्षबोधी महाथेरो संभाजीनगर यांची धम्मदेशना होणार आहे सायंकाळी धम्मबोधी डोंगरे, मनोहर वानखडे अकोला यांचे प्रबोधनात्मक मार्गदर्शन राहणार आहे. तर १९ एप्रिल रोजी सकाळी प्रा. मुकुंद भारसाकळे,अशोक इंगळे, रमेश तायडे,एस.एम.पांडे, एस.आर. उबाळे यांचे मार्गदर्शन होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पी.जे.हिवराळे राहणार आहेत. सायंकाळी 'ही रात्र शाहीरांची' हा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बेबीताई नामदेव पारवे यांच्याकडून भोजनदान होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments