Advertisement

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *जयंती साजरी*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर* *जयंती साजरी* 


 *खामगाव,* :- १४ (उमाका) उप माहिती कार्यालय, खामगाव (जि. बुलढाणा) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी नायब तहसिलदार अभिजीत जोशी, नायब तहसिलदार शिरीष वसावे, नायब तहसिलदार निखिल पाटील, उप माहिती कार्यालयाचे अनिल महल्ले, महसूल सहाय्यक एस. व्ही. कलोरे, महसूल कर्मचारी जीवन बटवे, नंदू चौधरी, उमेश भालेराव, कु. वैशाली जंजाळ, अनिल जाधव तसेच पत्रकार मंडळी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक समता, बंधुता व न्याय या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प केला.


Post a Comment

0 Comments