Advertisement

खामगाव कर वाढीला शिवसेना .पक्षाची दखल घेत उपमुख्यमंत्री यांनी दिली स्थगिती* खामगाव/(संतोष आटोळे )

*खामगाव कर वाढीला  शिवसेना .पक्षाची दखल घेत उपमुख्यमंत्री यांनी दिली स्थगिती* 
खामगाव/(संतोष आटोळे )
खामगाव नगर परिषद मालमत्ता कर वाढीला एक एप्रिल च्या पत्राद्वारे मिळाली स्थगिती.
खामगाव नगर पालिका क्षेत्रामध्ये शंभर ते एक हजार टक्के कर वाढ लागू केली होती 
त्यासाठी खामगाव करण वर होणाऱ्या अन्यायकारकरवाडीकरिता खामगाव शहर व तालुका शिवसेनेने या गंभीर विषयाची दखल घेत
 श्री. प्रतापराव जाधव, मा. राज्यमंत्री (आयुष मंत्रालय और स्वास्थ्य एवं परिवार कल्याण) भारत सरकार यांनी मा. उपमुख्यमंत्री महोदयांना या बेसुमार वाढ बाबत अवगत केले 
व तसे रीतसर पत्र
सादर  दिनांक ०५ मार्च, २०२६ रोजी  सरकार दरबारी दाखल केले नगर परिषद, खामगांव, ता. खामगांव, जिल्हा बुलडाणा ने केलेल्या भरमसाठ वाढीव मालमत्ता कर, पाणी कर, खुले प्लॉट आणि नविन ९% फेरफार करास स्थगिती साठी सदर पत्रावर मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी "अ प्रमाणे स्थगिती देवून सुनावणी ठेवा" असे निर्देश दिले

  यानुसार कार्यवाही करन्यात आली  मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशांनुसार पत्रामध्ये विनंती केल्याप्रमाणे करवाढीस स्थगिती देण्यात यावी. तसेच याबाबत मा. उपमुख्यमंत्री महोदयांकडे सुनावणीचे अनुषंगाने स्वयंस्पष्ट अभिप्रायांसह अहवाल शासनास सादर करावा, असे पत्र जिल्हाधिकारी बुलढाणा
यांना सुचविण्यात आले आहे 
शिवसेना मुख्यनेते,महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथराव शिंदे साहेब व केंद्रीय मंत्री मा.ना.प्रतापराव  जाधव साहेब यांचे आभार मानित 
तसेच हिंदुसेवक अमोलजी अंधारे,शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र भाऊ बघे,शहरप्रमुख चेतन भाऊ ठोंबरे तसेच खामगाव नगर परिषद मालमत्ता कर वाढीला विरोध दर्शविणारे व हरकती दाखल करणारे सर्व नागरिक तसेच व्यापारी,डॉक्टर,वकील,व सर्व संघटना समस्त शिवसेना खामगाव शहर व तालुका पदाधिकारी शिवसैनिक यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे

Post a Comment

0 Comments