Advertisement

जय मल्हार नवयुवक मंडळाचा नंगर सोहळा सामाजिक ऐक्याचा प्रतीक...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*

*जय मल्हार नवयुवक मंडळाचा नंगर सोहळा सामाजिक ऐक्याचा प्रतीक...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा*
*येळकोट-येळकोट जय मल्हार च्या जयघ्ाोषाने आवार येथे भव्य नंगर सोहळा महोत्सव उत्साहात* 
 खामगाव/(संतोष आटोळे )        आवार येथील जय मल्हार नवयुवक मंडळाच्या वतीने दरवर्षी खंडोबा रायाचा भव्य नंगर सोहळा आयोजित करण्यात येत असतो. या माध्यमातून बाहेरगावावरुन आलेली वाघे मंडळी जागरण गोंधळ,भजन-किर्तन यासारखे कार्यक्रम सादर करतात.ज्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतीक वातावरण निर्माण होते.अश्या पारंपारीक उत्सवामुळे आपल्या संस्कृतीचे जतन होत असुन समाजात एकजुटीची भावना दृढ होते.गावातील सर्व नागरीक एकत्र येवुन या विधायक कार्यात सहभागी होतात. हा नंगर सोहळा सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले.

दि.04 एप्रिल 2026 रोजी आवार येथील जय मल्हार नवयुवक मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याहीवर्षीही नंगर सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खामगाव तालुकाअध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, बाजार समितीचे संचालक विलाससिंग इंगळे,जामुवंतराव देशमुख, नागापुरचे सरंपच कैलास वासनकार,विठठ्ल धानोरे,वैभव धानोरे,हरिभाऊ पेसोडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी श्री खंडोबा रायाचे व नंगरचे पुजन करुन दर्शन घेतले. यावेळी जय मल्हार नवयुवक मंडळाच्या वतीने माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शेला,टोपी देवुन सत्कार करण्यात आला.यावेळी जय मल्हार नवयुवक मंडळाचे अध्यक्ष मारोती बोंद्रे,गणेश खऱ्हाटे, ज्ञानदेव वैतकार,विष्णु महाराज गाडगे,संतोष साबे, विनोद खराटे,संतोष लोणाग्रे,विश्वनाथ वैतकार,गणेश साबे, रघुनाथ मुयांडे, योगेश खराटे,मनोहर लोणाग्रे,राजेश वैतकार,गोपाल खराटे, वैभव वैतकार,विशाल वैतकार,सागर मुयांडे,गोवर्धन भिसे यांच्यासह जय मल्हार मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
नंगर सोहळयानिमित्त 4 एप्रिल रोजी वाघेमंडळींचे रात्रभर जागरण गोंधळ होवुन दि.05 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता देवाचे लग्न लावुन हजारो भाविकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरआप्पा मिटकरी व सहकाऱ्यांंच्या हस्ते नंगर तोडण्यात आला.तद्नंतर गावातून भंडारा उध्ाळत खंडोबारायाची मिरवणूक काढण्यात आली.भव्य नंगर सोहळा महोत्सवानिमित्त रविवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पंचक्रोशीतील हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. नंगर सोहळयाच्या यशस्वीतेसाठी जय मल्हार नवयुवक मंडळ आवार व आवार येथील समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले. येळकोट-येळकोट जय मल्हारच्या घ्ाोष्ाणेने आवार गाव दणाणून गेले होते.

Post a Comment

0 Comments