*सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत सुपरस्पेशालिटी व मल्टीस्पेशालिटी रोगनिदान शिबिराचे आयोजन*
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे व एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटीकल केअर व ट्रॉमा सेंटर मागील १० वर्षापासून कार्यरत आहे. २४ तास निरंतर अत्यावश्यक सेवा व तज्ञ डॉक्टर्स ची उपलब्धता, प्रशिक्षित नींग स्टाफ, आरोग्यदायी वातावरण, स्वच्छता व मनमिळावू कर्मचारी वृंद यामुळे काही दिवसातच सिल्व्हसिटी हॉस्पिटल रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी पहिल्या पसंतीचे उपचार केंद्र म्हणून नावारुपास आले.
सिल्व्हसिटी हॉस्पिटलच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते दु. २ पर्यंत भव्य मोफत सुपरस्पेशालिटी व मल्टीस्पेशालिटी रोगनिदान शिबिराचे आयोजन सिल्व्हरसिटी हॉस्पिटल, जलंब रोड, खामगांव येथे आयोजित केले आहे. कित्येक रुग्णांना सुपरस्पेशालिटी संबंधित तपासणीसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते. ती सुविधा खामगांव येथे उपलब्ध करुन देण्याचे उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागपूर व अकोला येथील सुप्रसिध्द तज्ञ रुग्ण तपासणी करून सल्ला देणार आहेत. यामध्ये अकोला येथील सुप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ. दिपक बोहरा, न्युरोसर्जन डॉ. नरेंद्र भागवत, न्युरोसर्जन डॉ. अखिलेश अग्रवाल, किडणीरोग तज्ञ डॉ. अमर सुलतान, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अभय बागुल, युरोलॉजिस्ट डॉ. सुमित अग्रवाल, नागपूर येथील मिडास हॉस्पिटलचे लिव्ह व पोटविकार तज्ञ डॉ. शुभंकर गोडबोले, अकोला येथील सुप्रसिध्द लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अभिषेक भागवत, इनफर्टीलिटी तज्ञ डॉ. सी. दिपाली सुलतान, चर्मरोग तज्ञ डॉ. राजेश केडीया, बालरोग सर्जन डॉ. पराग टापरे, सौंदर्य व केशरोपण तज्ञ डॉ. सौ. अंशालिका अग्रवाल तसेच सिल्व्हसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मधील सर्व तज्ञ डॉक्टर्स यांची उपस्थिती लाभणार आहे. गरजु रुग्णांनी शिबिरात सहभागी होण्यासाठी नांव नोंदणीसाठी ९१४६१८५६११ व ९१४६१८५६१२ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
तरी या सुवर्ण संधीचा बुलढाणा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिल्व्हरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खामगांव चे अध्यक्ष डॉ. अशोक बावस्कर, कार्यकारी संचालक डॉ. पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग महाजन व उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव लगा तसेच सर्व संचालक मंडळाने केल्याचे प्रशासकीय अधिकारी श्री. निलेश बैरागी यांनी एका पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 Comments