Advertisement

राष्ट्रनिष्ठा,धैर्य आणि बलिदान याची अद्वितीय प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज*

*राष्ट्रनिष्ठा,धैर्य आणि बलिदान याची अद्वितीय प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज*
...माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
 खामगाव /(संतोष आटोळे) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे अंत्यत शुर व पराक्रमी राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेचा वारसा समर्थपणे पुढे नेत छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाने इतिहासात अढळ स्थान निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,  संकटांचा डोंगर समोर असतांनाही त्यांनी कधीही स्वराज्याशी तडजोड केली नाही. राष्ट्रनिष्ठा, धैर्य, विद्वत्ता आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केले. गुरुवार दि.14 मे 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रीमती सरस्वतीताई खासणे, खामगाव तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुभाष पेसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष केशव कापले, मुन्ना बोंद्रे, निलेश तासतोडे, अभय कुळकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजयांनी आपल्या अल्प आयुष्यात स्वराज्यासाठी अतुलनीय बलिदान दिले.छत्रपती संभाजी महाराज.महाराज फक्त तलवारीचे धनी नव्हते, तर ते संस्कृत, हिंदी, फारसी यांसारख्या अनेक भाषांचे अभ्यासक, उत्कृष्ट लेखक आणि दूरदृष्टी असलेले राज्यकर्ते होते. हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या संघठन कौशल्यापासुन प्रेरणा घेवुन समाज उपयोगी उपक्रम राबवुन जनतेला न्याय देण्यासाठी  पक्ष संघठन अधिक मजबुत करावे असे सांगुन माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग आणि राष्ट्रनिष्ठेला त्रिवार अभिवादन करुन उपस्थितांना जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते मिठाईचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी जय भवानी-जय शिवाजी,छत्रपती संभाजी महाराज की जय अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी तर आभार प्रदर्शन शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने यांनी केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments