*लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय येथे फळ व भोजन वाटप*
खामगाव/(संतोष आटोळे) महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या वतीने जनसेवा सप्ताह राबविण्यात येत असुन यानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक व जनहिताचे उपक्रम राबविले जात आहे.खामगाव विधानसभा मतदार संघामध्ये सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीदिनी बुधवार दि.22 जुलै 2026 रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते सामान्य रुग्णालय खामगाव येथे रुग्णांना फळ व बिस्कीटांचे वाटप करुन तसेच गरजुंना भोजन वाटप करुन सामाजिक बांधीलकी जपत जनहितकारी उपक्रम पार पडले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पंजाबरावदादा देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या खामगाव शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने,खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे, शहर उपाध्यक्ष नरहरी टिकार गुरुजी,शेगाव पंचायत समितीचे माजी सभापती विजय काटोले,खामगाव कृ.उ.बा.संचालक विलाससिंग इंगळे,नगरसेवक तहेसीन शाह,आबीद कुरेशी,मो.अन्सार भाई आदींची आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम सामान्य रुग्णालयातील लॉयन्स क्लब संस्कृतीच्या अन्नछत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले.या अन्नदान उपक्रमामध्ये पोळी-भाजी, मसाला भात तसेच बिस्कीट पुड्यांचे वितरण करण्यात आले. तद्नंतर लोकनेते स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त सामान्य रुग्णालयातील रुग्णांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते फळ व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. यावेळी सानंदांनी रुग्णांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस सुध्दा केली.
याप्रसंगी बोलतांना माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, समाजातील वंचित,गरजु आणि रुग्णांच्या सेवेतुन स्व.अजितदादा पवार साहेब यांच्या लोकाभिमुख विचारांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निरंतरपणे जनहितकारी उपक्रम राबविले जातील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला अनंता धामोडे,डॉ.आर.के.राजपुत,पुरुषोत्तम शेजोळे,पवन पवार,श्याम मोरे, मुन्ना बोंद्रे,आनंद किलोलीया, मोहम्मद सहेलीम, संतोष आटोळे, निलेश तासतोडे,आनंद गायगोळ,निलेश इर्शिद, बाबुराव वनारे, शेषराव गोरे, एजाज देशमुख, शेख अयाज,शेख युनुस,मोहम्मद सहेलीम श्रीकृष्ण डाबेराव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी अमर रहे-अमर रहे-स्व.अजितदादा पवार साहेब अमर रहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, आम्ही सर्व सुनेत्राताई पवार पर्व अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
0 Comments