*खामगाव : आषाढी एकादशी व कारगिल विजय दिवस फराळ फळ बिस्कीट वाटप एकनिष्ठाचा उपक्रम*
खामगाव /(संतोषआटोळे ) आषाढी एकादशी व कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या वतीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी सलग दोन दिवस सेवा उपक्रम राबविण्यात आला. आषाढी एकादशीला फराळी चिवडा वाटप
दि. 25 जुलै 2026 शुक्रवार रोजी आषाढी एकादशीनिमित्त सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना फराळी चिवड्याचे 500 पाकिटे वाटप करण्यात आली. उपवास असलेल्या नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला. *कारगिल विजय दिवस केळी व बिस्कीट वाटप*
दि. 26 जुलै 2026 शनिवार रोजी कारगिल विजय दिवस देशभक्तीच्या भावने साजरा करण्यात आला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केळी व पारले-जी बिस्कीट वाटप करण्यात आले. *वाढदिवसही साजरा केला सेवेतून*
हा संपूर्ण उपक्रम *सुरजभैय्या यादव* यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. तसेच फाउंडेशनचे तालुका उपसचिन विक्की इंगळे यांनी त्यांची कन्या *कु. सवी विक्की इंगळे* वय 3 वर्ष या चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त कोणताही व्यर्थ खर्च न करता, सामाजिक बांधिलकी जपत सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केळी व बिस्कीट वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे रुग्णालयात सेवाभावाचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
या दोन दिवसीय उपक्रमात प्रमुख उपस्थित सुरजभैय्या यादव, रविंद्र इंगळे, विक्की इंगळे, शेख सलीम शेख फरीद, अविनाश घोडके, रुपेश कलंत्री, संतोष आटोळे, सुरज लोंढे, भारत पंजवाणी, गौरव कवटेकर, गोपाल इटीवाले, विनोद कळसकर, अमोल ताठे, शंकर कोळसे, अक्षय भोजने, पंकज नसुर्डे, आश्विन इंगळे, धम्मपाल गवई, कैलास इंगळे, बाळू इंगळे, राजू इंगळे,१ सेट, शैलेश इंगळे, दिलीप इंगळे, अतुल इंगळे, प्रदीप इंगळे, संदेश इंगळे, अनुप लोखंडे, सचिन इंगळे, सोहम ठोसरे, रुद्र ठोसरे, अमर तेलंग, नरेश मसनेवार, शिवा वनारे आदि लोकांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरज लोंढे हे होते तसेच सूत्रसंचालन रुपेश कलंत्री यांनी केले तर आभार अविनाश घोडके यांनी मानले. अशी माहिती शेख सलीम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
0 Comments