सावळदबारा आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरा:प्रा.जीवन कोलते यांची मागणी
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव तालुक्यातील सावळदवारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्राला देव्हारी, टिटवी, पळसखेडा, चारुतांडा,डाभा,नादांगाव, मोलखेडा, हिवरी, घाणेगांव तांडा, नादांतांडा, रवळा,जावळा व सावळदबारासह अठरा गावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांअभावी रुग्णांची गैरसोय होत असल्याने रुग्णांना खासगी दवाखान्यात जास्त पैसे मोजावे लागत आहेत. याबाबत वैद्यकीय अधिकारी विलास राजपूत यांच्याशी प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते) व उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांनी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की खरोखरच कर्मचारी यांच्या संख्या कमी असल्याने आमच्यावरही अतिरिक्त भार येत असल्याने आमच्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही वारंवार रिक्त पदे भरण्याची आम्ही मागणी केली आहे. हे केंद्र औरंगाबाद जिल्हा मुख्यालयापासून १६० किलोमीटरवर असल्याने सावळदवारा हे गाव अतिदुर्गम भागात असल्याने आपल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही या ठिकाणी दिसते. सावळदवारा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत १८ खेड्यांचा तर चार उपकेंद्रांचा समावेश आहे. यामध्ये एकूण २० पदे आहेत. त्यापैकी फक्त आठच पदे भरली गेली आहेत, तर बारा पदे आजूक शुद्धा रिक्त आहेत. सावळदबारा पीएससीमध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि अठरा गावाचा भार आहे. एक वैद्यकीय अधिकारी,एक महिला आरोग्य सहायक, एक शिपाई व एक लॅब टेक्निशियन ही पदे भरली गेली आहेत तर एक वैद्यकीय अधिकारी, एक औषध निर्माता, एक आरोग्य सहाय्यक पुरुष, एक कनिष्ठ सहाय्यक एक, ओपीडी एनएम, तीन शिपाई ही पदे रिक्त सध्या रिक्त आहेत.अशी माहिती रजेवर असलेले डॉ. विलास राजपूत यांनी सांगितले. असता हे रिक्त असलेले पदे त्वरित भरा ग्रामीण भाग असल्याने रुग्णांची खूपच हेळसांड होत आहे अशी मागणी प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते)व उपसरपंच मो.आरिफ मै.लुखमान यांनी लेखी निवेदने द्वारे कळविले आहे.
0 Comments