जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत
पहूर येथील पुनम देशमुख द्वितीय
सर्वच स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव .
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव जवळ असलेले जामनेर
तालुक्यातील पहूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पुनम शाम देशमुख हिने समतावादी साहित्य शिक्षक मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला .
क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . पुनम देशमुख या विद्यार्थिनीने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला ,त्याबद्दल तिला सन्मानचिन्ह ,प्रमाणपत्र
,ग्रंथ आणि गुलाब पुष्प देऊन समतावादी साहित्य शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भरत शिरसाठ , उपाध्यक्ष डॉ . अतुल सूर्यवंशी , रणजीत सोनवणे , सचिव एस . ए . पाटील ,वक्तृत्व स्पर्धा समिती प्रमुख श्रीमती वर्षा अहिरराव आदी मान्यवर साहित्यीक , पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शंकर भामेरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले . पुनम देशमुख हिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
0 Comments