Advertisement

घाणेगांव तांडा व टिटवी येथे कृषी माफँत सोयाबीन उगवणक्षमता प्रात्यक्षिक संपन्न सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण

 घाणेगांव तांडा व टिटवी येथे कृषी माफँत सोयाबीन उगवणक्षमता प्रात्यक्षिक संपन्न


सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण



सोयगाव तालुक्यातील घाणेगांव तांडा व टिटवी,पळसखेडा येथे   दिनाक 26/4/2022 रोजी  घानेगाव तांडा व टीटवी या गावात सोयगाव कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली  सोयाबीन उगवणक्षमता चाचणीचे प्रा त्यक्षिक करून दाखवण्यात आले या वेळी कृषी सहायक ए एस सुरडकर, एम आर भोळे,देशमुख साहेब यांचेकडून शेतकऱ्याना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले उगवण क्षमता चाचणीत 70 टक्के किवा त्यापेक्षा. जास्त उगवण क्षमता आलेल्या सोयाबीनचाच बियाणे म्हणून वापर करावा तसेच पेरणी पूर्वी बियाण्यास थायरम व रायझोबियमची बीज प्रक्रिया करावी असे आव्हान शेतकऱ्यांना करण्यात आले तसेच शेतकऱ्यांनी आपल्या कडे राखून ठेवलेल्या घरच्या बियाण्यांचाच जास्तीत जास्त वापर करावा असेही आव्हान करण्यात आले यावेळी सरपंच सौ.रत्नाताई सुरेश चव्हाण, उपसरपंच हिरा जाधव,गोविंद महाराज,सरपंचपती सुरेश चव्हाण(सामाजिक कार्यकर्ते), उपस्थित होते. व  टिटवी गावचे सरपंच सौ.संध्याताई भागवत जाधव,उपसरपंच लहू राठोड, ग्रामसेवक एस.जी.काळे,कईम तडवी,दिपक चंडोल,रुबीना तडवी,रंजना जाधव, सायरा तडवी, रोजगार सेवक संदीप जाधव व सरपंचपती भागवत जाधव, व गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते




Post a Comment

0 Comments