Advertisement

ग्रामपंचायत पालोरा येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय चमू द्वारे तपासणी

 *ग्रामपंचायत पालोरा येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय चमू द्वारे तपासणी


*                     =========================

आज दिनांक २५/०४/२०२२ ला पंचायत समिती पवनी अंतर्गत ग्रामपंचायत पालोरा येथे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०१९-२० या आर्थिक वर्षामधील विभागीय तपासणी समितीद्वारे तपासणी करण्यात आली. त्यावेळी ग्रामस्थांनी तपासणी अधिकाऱ्यांचे अत्यंत आदरयुक्त स्वागत केले. त्यानंतर तपासणी समितीमधील अधिकारी यांनी संपूर्ण गाव फिरून गावातील परिसर स्वच्छता,सार्वजनिक स्थळे,पाण्याचे स्त्रोत,शाळा,अंगणवाडी येथील शौचालय व स्वच्छता,वैयक्तिक स्वच्छता,सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापण व धार्मिक स्थळे इत्यादी बाबी विचारात घेऊन तपासणी केली. त्यावेळी मा. उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.कोल्हे मॅडम,जिल्हा परिषद भंडारा, मा. गट विकास अधिकारी श्री लांजेवार साहेब, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री कुंभरे साहेब,जी.पा. व स्व मिशन कक्ष येथील गजापुरे सर, सरपंच,सचिव,संपूर्ण ग्रामपंचायत पदाधिकारी,आशा,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,बी.आर.सी.कर्मचारी श्री तऱ्हेकार , ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      




        

********************************

Post a Comment

0 Comments