मुस्लीम बांधवांच्या उपवासाचा महिना यालाच रमजान असे म्हणतात.‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिनचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.
या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या सार्या गोष्टींना तिलांजली देऊन ज परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्या अर्थाने कबूल झाली. पैगंबरांची इबादत स्वत:साठी नव्हतीच मुळी. ती इबादत होती लोककल्याणासाठी, समस्त मानवमुक्तीसाठी. या महिन्यापासूनच पवित्र कुराणाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचण्याला सुरुवात झाली. ईश्वराच्या प्रसन्नतेची, विशालतेची साक्ष देणारा महिना म्हणूनही या महिन्याचे आगळेवेगळे स्थान अबाधित आहे. माणसाला त्याच्या भलबुर्याची, पाप-पुण्याची जाणीव करून देणार्या या महिन्यात उपवास कराचे असतात. उपवास म्हणजे आत्म्याचे, आचारविचारांचे शुद्धीकरण होय. माणसाच्या या आचार-विचारांच्या शुद्धीकरणाची ही निकड कितीतरी वर्षापूर्वी सांगण्यात आली आहे. आजही त्याची नितांत निकड भासते. यावरून पैगंबरांच्या दूरदृष्टीची कल्पना सहजगत येऊ शकते. रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वतरुळात राहून करणे हो. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीचा असर, नूर काही वेगळाच असतो.
असाच एक रोजा रमजान महिन्याच्या 26 तारखेला असतो त्याला मोठा रोजा ही म्हणतात.या दिवशीचा रोजा इतर रोजापेक्षा खूप मोठा आणि खडतर असतो.हा मोठा रोजा ऊसरा येथील अलिजा फातेमा सैय्यद रियासोद्दिन वय 8वर्षे आणि सैय्यद अयान सैय्यद अमिनोद्दिन वय 10वर्ष यांनी ठेवला होता
.
0 Comments