सावळदबारा येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी
सोयगाव औरंगाबाद प्रतिनिधी सुनील चव्हाण
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे ग्रामपंचायत कार्यालयात हिंदू क्रांती सुर्य,मेवाडरत्न,विरशिरोमणि महाराणा प्रताप यांची ४८२ वी जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस बिटजमादार मिरखाँ तडवी व ग्रा.पं.सदस्य मोहन सुरडकर यांनी पुष्पहार अर्पण करून मोजक्या लोकांत महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली.तदनंतर महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस प्रा.जीवन कोलते(सामाजिक कार्यकर्ते) व उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान यांनी पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडले याप्रसंगी प्राचार्य पंजाबराव कोलते(पाटील) यांनी विरशिरोमणि महाराणा प्रताप यांच्या जीवनावर थोडक्यात माहिती दिली.देशप्रेम, त्याग, बलिदान, संघर्ष या गुणांचे प्रतिक म्हणून महाराणा प्रताप भारतीय समाजासाठी श्रद्धा आणि अभिमानाचा विषय आहे. त्यांचे नाव घेतले की आपल्या डोळ्यांसमोर मोगल साम्राज्याच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या शौर्याने परिपूर्ण असलेल्या वीर योद्ध्याची प्रतिमा साकार होते. ज्याने स्वातंत्र्य मिळविण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कठीण संघर्ष केला. भौतिक सुख साधनांचा त्याग करीत त्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी केलेला सातत्यपूर्ण संघर्ष म्हणजे भारतीय स्वातंत्र्य युद्धातील सुवर्णाक्षराने लिहिलेले प्रकरण आहे. आज भारतात राष्ट्रीय भावना हीनतेच्या दिशेने अग्रेसर होताना दिसत आहे. अशा वेळी महाराणा प्रताप यांचे जीवन चरित्र आदर्श देणारे आहे. याच कारणामुळे मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या उपासकांसाठी ते नेहमीच संस्मरणीय आणि वंदनीय ठरले आहेत. असे सांगून महाराणा प्रताप जयंती मिरवणूक न काढता साध्यापणाने साजरी करून फटाक्यांचा आवाजात जल्लोषात ग्रामपंचायत कार्यालयात व परिसरात साजरी केली. यावेळी पंजाबराव राजपूत, अजाबराव राजपूत, संजय राजपूत, उत्तम राजपूत, पवन राजपूत, संदीप राजपूत, विजय बाविस्कर, भिका राजपूत, शंकर राजपूत, संतोष राजपूत, अशोक सुर्यवंशी,रतन राजपूत,आणिल राजपूत, सुनील राजपूत,उपसंपादक गोकुळसिंग राजपूत, व संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments